पाथर्डी नगर जिल्ह्यातील एक तालूका अनेक संताच्या वास्तव्याने पावन झालेला तालूका . नेहमी दुर्लक्षीत झालेला व संघर्षमय तालूका अशा ह्या भागात विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे ह्या हेतूने प.पू श्री रत्नऋषीजी म. सा . यांच्या प्रेरणेने व स्व.मोतीलालजी गुगळे , स्व.उत्तमचंद मुथ्था व स्व. मगनलालजी गांधी यांच्या पुढाकाराने ३ जून १९२३ रोजी श्री तिलोक जैन विद्यालयाची स्थापना झाली . ९८ वर्षे पूर्णत्वा कडे जाताना शाळा दामदौडात उभी आहे .
केवळ ९ विद्यार्थ्यांत सुरु झालेली हि शाळा आज हजारो विद्यार्थी विद्याज्ञान घेत आहे . हि माझ्यासह अनेकांना आनंदाची बाब आहे . या शाळेच्या विकासासाठी प.पू श्री आनंदऋषीजी महाराज साहब यांचे कृपा अर्शिवाद व मौलीक मार्गदर्शन लाभले. या शाळेला प्रथम मुख्याध्यापक श्री गोवींद सिताराम वराडे हे त्यागमय विद्वान शिक्षक लाभले . प्रथम परिक्षा ही महाराष्ट्र विधान सभेचे सभापती कै. कुंदनमलजी फिरोदिया यांनी घेतली .
मराठी बालवर्गापासून इयत्ता सातवी पर्यत इंग्रजी शिकवण्यात येऊ लागले . सन १९४९ मध्ये इ.८वी ते ९वी पर्यत शाळेला सरकारी मान्यता मिळाली .
शाळेसाठी गावा बाहेर इमारत बांधण्याचे ठरले व तातकालीन संस्थेचे ट्रस्टी भाऊसाहेब फिरोदिया यांच्या हस्ते व श्री अमलोकचंदजी सुरपुरीया यांच्या अध्यक्षतेखाली इमारतीची पाया भरणी झाली .
१९४८ साली विद्यार्थी संख्या १३८ होती , १९५० साली १९७ होती ,१९५३ साली २६५ अशी भरभराट होऊ लागली . १९५१ साली एस.एस.सी परिक्षेत १७ विद्यार्थी बसले होते , त्या पैकी १३ उत्तीर्ण झाले शिवाय एस.एस. सी परिक्षेचा निकाल ९०% लागला .
श्री पी.पी मेहेंदळे सर त्या काळातील अतिशय कडक शिस्तीचे विद्वान गृहस्थ मुख्याध्यापक म्हणून लाभले या विद्यालयाच्या गौरवशाली इतिहास मेहेंदळे सर व मेहेंदळेबाई यांचे खूप मोठे योगदान आहे. प्रयोगशील , शिस्तप्रीय दांपत्य म्हणून त्यांनी आपली सर्वत्र ओळख निर्माण केली .
एन .सी. सी , गर्लगाईड आदी उपक्रम होऊ लागले . विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण देऊन स्वयंपूर्ण बनिवने व समाजात त्यांना पायावर उभे व संयभू बनवने हा निर्णय संस्थाचालकांनी घेतला या नूसार सरकारी दरबारी प्रयत्न सुरु झाले .
टर्निग , फिटींग , वेल्डींग , मोल्डींग व कारपेटरी इ. विषयाचे मशिनरी साठी ३ते४ लाख व तेवढेच इमारती साठी जमवणे , विना अनुदान तत्वावर टेकनिकल हायस्कूल चालवणे हे एक दिव्यच होते . परंतु आचार्य भगवंताच्या कृपेने सर्व शक्य झाले . टेकनिकल शिक्षण देणारे ते एकमेव विद्यालय होते त्या साठी योग्य शिक्षकवृंद निवडले गेले . थोरातसर , जरांगेसर , सुतारसर ,वाकलकरसर हे ते शिक्षक होते , इतकी शानदार निवड संस्थेची होती . विद्यालय उभारण्या पासून शिक्षक निवडण्या पर्यत संस्थेचा दृर दृष्टीकोन किती सुद्रुढ होता हे दिसून येतो .
मेहेंदळे दांपत्य , भोसे दांपत्य , केदार दांपत्य , उरणकर बंधू , सुराणा बंधू या जोड्या चंद्रात्रेय , हंडाळ , बारगजे , दुकळे , कराळे , चपके ,कुलट पीता पुत्र ,बाहेती , गायकवाड ,कौसे , खाबीया , भंडारी , असा ज्ञानाने भरलेला खजीना संस्थे कडे होता . करण्यासाठी काही पण करण्याची जिद्दीचे फळ स्वरुप संस्थेचे विशाल रुप व दुर दृष्टी , सामूहीक प्रयत्न संस्थेला एक परिवार संबोधन योग्य ठरते . विद्यालयाच्या विशालतेने शहराचा काया पलट करुन टाकला , खेडोपाडी ज्ञान पोहचण्यात संस्थेचा सिंहाचा वाटा आहे .
गावातील शाळा सातवी पर्यंत होती , त्यानंतरचे शिक्षण मोठ्या शाळेत जी गावाबाहेर होती . तसे नगर रस्ता भव्य व मोठा होता , वाहतूक कमी होती , शाळाची जागा खूप मोठी आहे . भव्य महिरप कमान त्या सुवर्ण अक्षरात कोरलेले शाळेचे नाव दोन्ही बाजूस मयूर स्थापन वर्षे मध्यभागी दोन बाजूने उघडणारे गेट साईडला दोन पिलरच्या साह्याने उभारलेले छोटे गेट शाळेला कडक तारेचे कुंपन गेटच्या समोर रेषेत अंडाकृती हौद त्यावर कांरजी बाजूला गोलराऊंड मध्ये एक डोर सायकल स्टँण्ड त्या बाजूला रस्ता सोडून आँफीस समोर इ आकारातील बिल्डिंग हि उत्तम इंजिनियर ची कल्पकता शाळेची विविधता दाखवून देते . शाळा निसर्गाच्या सानिध्यात होती त्यामुळे शाळा दूर असून देखील शाळेत जाण्याची उत्सुकता असायची .
शाळेने अनेक विद्यार्थी घडवले , त्यात राजकारणी , समाजसेवक , अधिकारी होते . १९५२ मध्ये केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे ,१९६१ मध्ये सी.डी फकीर साहेब जे माजी मुख्य अभियंता भारतसरकार होते. आत्ताचा विशाखापट्टम हायवे त्यांच्या शेवटच्या कार्यकाळात त्यांनी मंजूर करुन घेतला व शहराला भव्यतेत जोडून देण्यात महत्त्वाचा दुआँ बनवला हि एक प्रकारे त्यांनी ऋण उतराई केली .
१९५२ प्रो.के.पी सोनवणे माजी कुलगुरु मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद . १९७८ महेश मुरलीधर भागवत सध्याचे हैद्राबाद चे पोलीस उपनिरीक्षक ( रांचीकोंडा) या पदावर कार्यरत आहे .१९९५ साली शिवाजी राठोड आय पी एस कार्यरत आहे , नुकतीच त्यांची बढती होऊन कार्यरत आहे . अनेक विद्यार्थी संस्थेचे मान द्विमान करीत आहेत . जडण घडणीत संस्थेने कधी दुजभाव केला नाही .
आज हा लेख लिहताना विशेष आनंद होत आहे . माझे वर्ग मित्र आज उच्च पदावर कार्यरत आहे , .अनेक विद्यार्थी मित्र व्यवसायात प्रगती करत आहे . अविनाश ढाकणे हे मंत्रालय परिवहन आयुक्त म्हणून कार्यरत आहे . अनेक वर्ग मित्र अनेक क्षेत्रात आपली सिध्दता सिध्द करुन अग्रेसर आहे . जसे वृक्षाची मुळे दूर दूर पसरतात . जसे वृक्षाला अनेक शाखा असतात तसेच संस्थेतील माजी विद्यार्थी आज वेगवेगळ्या जिल्ह्यात राज्य व देशा बाहेर देखील कार्य करत आहे . लवकरच विद्यालय शतकी वाटचल करीत असताना अत्यंत हर्ष व अभिमान वाटत आहे . अशा या शाळेला शत शत नमन करुन माझ्या सारख्याला देखील घडवले हे देखील मी स्वतः चे भाग्यच समजतो .
!! पढमं णाणं तओ दया !!
हि संस्कृत रचना गुरुज्ञाना विषयी माहेती देते . अनेक शहरात अनेक गोष्टीने इतिहासात स्थान मिळवले . परंतु छोट्या तालूक्याती शाळा ही इतिहासात सुवर्ण पानाचा मानाचा तुरा रोवला आहे . माझ्या गावातील ऐहतासीक विस्तूचा सार्थ अभिमान वाटतो . पाथर्डी या नावाला देखील एक इतिहास हा एक इतिहासच आहे . १०५ वर्षाची भांड्याची पेढी , ११५ वर्षाची किराणा दूकान आज पण त्याच जागेवर काम करुन नवीन रीढिता पीढी कार्य करत आहे . गुरुवर्य आनंदऋषी जन्म स्थान , मढीत कान्होबा , माहेंबात जालीदर संजीवनी समाधी , नाथ कालीन वृध्देश्वर मंदीर , शेणाचा रामदासाचे हनूमान मुर्ती हनूमान टाकळी , मोहटा गडावर रेणूका आई अशी वैभव शाली हि पाथर्डी आज कात टाकून पुढे जात आहे . हे अभिमाना स्पद आहे .
गो.रा.पलोड