“परिवार बँक”
(घराला घरपण देणारी बँक)
नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा एकदा जुन्या आठवणी नवे विचार घेऊन तुमच्या समोर येत आहे..आत्ताच जागतिक कुटुंब दिवस होऊन गेला.त्याचेच औचित्त्य साधून हे कथन करत आहे.
आपल्याला माहीतच आहे कुटुंब म्हणजे परिवार,family..पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती होती.म्हणजे नेमके काय तर पूर्वी घरे मोठी असायची, जागा असायची त्यामुळे अनेक नातेवाईक एकत्र राहायचे.दिवसा प्रत्येकजण आपल्या आपल्या कामात व्यस्त असायचे पण वेळ काढून एकत्र मध्यान्हभोजन(लंच)करायचे.रात्री सुद्धा सगळे एकत्र बसून सह परिवार जेवणाचा(डिनरचा) आनंद घेत असत.मग तेव्हा गप्पा,दिवसभर झालेल्या घडामोडी सांगणे,एकमेकांची चेष्टा करणे,हास्यविनोद,विविध गोष्टींवर चर्चा होत असत.त्यामुळे दिवसभरात आलेला थकवा,मरगळ,ताण,आपोआप कमी Sorry नाहीसाच होत असे..म्हणजे थोडक्यात पूर्वीचे एकत्र बसून जेवण करणे,गप्पा मारणे हेच मानसिक स्वास्थ्याचे औषध होते.कारण पूर्वी एकमेकांच्या मतांचा विचार केला जायचा ,व्यक्त होणाचा अधिकार सगळ्यांनाच होता आणि म्हणूनच पूर्वीचे लोक इतके आनंदी असायचे,ना कोणत्या गोष्टीचा मोह,आहे त्या परिस्थितीमध्ये सुखी जीवन जगत होते rather अजूनही काही गावांमध्ये खेड्यांमध्ये अशीच आनंददायी जीवनशैली दिसून येते.कारण त्यांनी विकास गरजेपुरता स्वीकारला पण आपली जीवनपद्धती नाही बदलली.आणि म्हणूनच आज त्यांना problems आहेत पण भीती नाही,चिंता नाही.ह्याचे मूळ कारण आहे ते जेवण.जेवण हे परिवाराला एकत्र आणायचे माध्यम होते sorry आहेच…ते म्हणतात ना प्रेमाचा मार्ग हा पोटातून जातो ते ह्याच अनुभवांमुळे सांगत असावे.कारण प्रेम तर कुटुंबावर पण करतो.घरच्या बायका साग्रसंगीत स्वयपाक करून आपल्या कष्टकरी धनीची,मुलाची,सासरे,वडील,दीर जे कोण असतील त्यांची वाट बघायचे.सासरे,वडील म्हणण्यामागचे कारण एवढेच की तेव्हाची माणसे ही लहानपणापासूनच कष्ट करून काटक बनलेली असतात तेव्हा ते शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या मजबूत असतात.ही जी ओढ असायची परिवारातील तीच ह्या एकत्रकुटुंब पद्धतीत मायेचा पाझर फोडायची आणि त्यांची नाळ चिरकाल टिकून राहायची..जेवणासाठी म्हणून सगळे एकत्र येतात आणि त्यानिमित्ताने 4 गोष्टी बोलल्या जातात,आणि प्रेम,आपुलकी वाढते..
परंतु आताची परिस्थिती फारच भयावह आहे..जशी विकासाची पातळी उंचावली तसा आपल्यातला मोह आपल्या गरजा प्रचंड वाढत गेल्या.जगाने विकास करायला सुरुवात केली पण ती कितपत उपयोगी आहे आणि किती काळासाठी उपयोगी आहे ह्याचा विचार करायला थोडे कमी पडले.आपण फक्त विकास पहिला आणि जे पळायला लागलो ते थांबायचे नावच घेत नाही..त्याचा परिणाम म्हणजे विभक्त कुटुंबपध्दती.कारण आपण इतके धावत असतो की घरच्या जबाबदऱ्यांची ओझी पेलणे कठीण झाले.मग एवढे नातेवाईक कसे एकत्र राहणार.करणार कोण एवढ्या लोकांचं?हा basic प्रश्न त्या आपल्या गराजांपुढे,चोचल्यांपुढे वरचढ ठरला आणि तिथून खरी सुरवात झाली दुराव्याची.कारण विकास म्हणले की नवे मार्ग नवी क्षेत्रे उपलब्ध झाली,आणि जसे फायदे दिसू लागले तशी विचारांची दिशाही बदलत गेली,मग आपसात मते पटेनाशी झाली म्हणून सुद्धा लोक आपले घर सोडून वेगळे होऊ लागले..त्यातच नवीन विकास होत गेला आपण ते स्वीकारत गेलो पण कधी हा विचार केला नाही की ह्या गोष्टी नव्हत्या तेव्हाही आपण जगतच होतो rather आतापेक्षा जास्त आनंदी जीवन जगत होतो.
परंतु शहरात आलो खरे.इथे flat system असल्याने विभक्त कुटुंबाला अजून एक निमित्तच झाले.त्यामुळे अजूनच माणसे लांब गेली,कामाचा ताण वाढला,गप्पा मारायला जवळची माणसे नाहीत,जेवायला तर काही काळवेळच उरली नाही.कारण सोबत नाही,वाट बघणारे कुणी नाही,एकटे भुतासारखे जेवायचे मग प्रेम,आपुलकी,ओढ ती कुठे राहणार?पण तरी काहीजण आवश्यक आहे गरज आहे म्हणून कुटुंबापासून दूर राहून कुटुंबासाठीच कष्ट करत लांब राहण्याचं दुःख,एकत्र जेवणाचा आनंद miss करतात पण ती काळाची,परिस्थितिची गरज असते.पण कितीही धावपळीचे जीवन असू दे निदान रात्री तरी एकत्र जेवण करायला बसले पाहिजे.तेवढा वेळ सगळ्यांनी काढायला हवा.कारण आपण मोठे भविष्याचा विचार करत मुलांकडे,घरच्यांकडे दिवसा लक्ष देऊ शकत नाही मग त्यांना निदान रात्रीचा जेवणाचा वेळ सोबत राहिल्याचा आनंद तरी मिळेल.नाहीतर एक दिवस तुम्ही ज्यांच्यासाठी सगळं करत आहात तेच म्हणतील की 1 मिनिट सुद्धा आम्हाला देऊ शकला नाहीत तर ह्या छान-छौकीचा काय उपयोग..त्यात अजून वाईट गोष्ट म्हणजे individual कुटुंबाचे काही अंश जाणवू लागले आहेत.म्हणजे आई एकीकडे वडील दुसरीकडे मूल असते तिसरीकडेच असे काहीतरी होताना दिसते..एवढी गरज आहे का वेगळे होऊन जीवन जगण्याची.कोणालाच सुख मिळत नाही,आणि मनाने तर कधीच जोडली जात नाहीत ही नाती.अशा कुटुंबाला कुटुंब तरी कसे म्हणावे.रक्ताची नाती आहेत म्हणून केवळ म्हणायला परिवार…आमचा एकत्र परिवार असतो पण online ह्याला म्हणतात का घरपण?
आणि अशा खूप लोकांच्या अवैचारीक वागणुकीमुळे आताची युवा पिढी ही आपुलकी,प्रेम ह्यांपासून दुरावली आहे.पूर्वी सण समारंभाच्या निमित्ताने लोक घरी यायचे आजूबाजूच्या लोकांची ओळख व्हायची आणि ते सुद्धा आपलेच होऊन जायचे.तेवढा विश्वास ठेवला जायचा की घर सुद्धा त्यांच्या हवाली करून लोक बाहेर जाऊन यायचे.परंतु आता शेजारी कोण राहते हे सुद्धा माहीत नसते तर trust ठेऊन घर त्यांच्या भरवसे सोडणे म्हणजे आपल्या पायावर कुऱ्हाडी मारण्यासारखे आहे…पण तीच सण समारंभाची आधुनिक पद्धत ही युवा पिढीने अवलंबली असावी.फक्त आजकालच्या मुला मुलींना हळदीकुंकू वगैरे नसून birthday party, get-together,trips ह्या सारखे functions असतात ज्यात ते विभक्त कुटुंबाला एकत्र आणतात.पण आता तेही कठीण होत गेल्यावर virtual family दिसते पण त्यात आपलेपण नसते..माणसाला माणसाचा आधार हवा असतो,साथ हवी असते पण ते ह्या विकसनशील जगात अवघडच आहे..म्हणून रक्ताच्या कुटुंबाबरोबर युवा पिढीने आपले वेगवेगळे कुटुंब तयार केले मग ते friend circle असो,जिथे काम करतो तो staff असो,संस्थेतले कर्मचारी असो.प्रत्येकाने आपण जिथे जिथे join आहोत connect आहोत तेच आपले कुटुंब मानायला सुरवात केली.मग मोठे का मागे राहतील त्यांनी त्यांचे परिवार बनवले.कारण तिथे तरी एकत्र जेवण करता येते,गप्पागोष्टी,हसणे,खिदळणे, discussions होतात.जे घरी आपल्याला एखादा दिवस ठरवून किती साध्या साध्या गोष्टींसाठी plan करायला लागतात.कारण रक्ताची family म्हणायला उरली आहे फक्त.कारण वेळ कोणाकडे आहे एकत्र यायला.म्हणून प्रत्येक जण हा घरच्यांपेक्षा आजूबाजूच्या लोकांमध्ये आपला परिवार शोधून घेतो आणि मग attachment वाढत जाते आणि आपुलकी प्रेम माया सगळं काही मिळू लागते.
त्यामुळे ज्या गोष्टी घरी माहीत नसतात त्या बाहेर सगळ्यांना माहीत असतात अशी situation निर्माण व्हायला लागली आहे कारण घरी वेळ कोणाकडे असतो ऐकायला, बोलायला,हसायला.कारण घरचे भविष्याचा विचार करून फक्त धावत असतात.त्यात घरचे सगळेच जर दिवसभर बाहेर असतील,मुले उठायच्या आधी निघायचे आणि मुले झोपाल्यावर रात्री उशिरा यायचे.मग मुलांकडे घरी बघायला सुद्धा वेळ उरत नाही.जेव्हा घरच्यांची साथ हवी असते तेव्हा जर देऊ शकला नाहीत तर पुढे मुलेही तुमच्या साथीला असतील का हे सांगता येणार नाही.पण म्हणजे कोणी कोणाचं स्वातंत्र्य हिरावून घेऊ नये..एकत्र कुटुंब पद्धतीत नंतर नंतर हेच होऊ लागले की स्वतःचे निर्णय सुद्धा दुसरे घेऊ लागले,इतरांची मते विचारात न घेणे,म्हणजेच तिथेही हुकूमशाही पद्धत आली असे म्हणायला हरकत नाही आणि म्हणून लोक विभक्त व्हायला लागले,स्वतःचा आनंद स्वतः शोधायला लागले पण तो विभक्तपणा इतका टोकाला गेला की एकटेपणाकडे वाटचाल होऊ लागली सगळे फक्त स्वतःचा विचार करू लागले,स्वार्थ बघू लागले. आणि अशा ह्या घरच्या एकांतपणामुळे आजच्या पिढीला ओढ ही बाहेरच्या कुटुंबाची असते जिथे मन मोकळे होते,ताण कमी होतो,problems ला solution मिळते.थोडक्यात कितीही वाईट स्थिती असू दे ते कुटुंब अपल्याला कधीच एकटे पडू देत नाही.आणि त्याच कारण म्हणजे त्याच कुटुंबातील रोजचे एकत्र जेवण.तीच अशी गोष्ट आहे जी सगळं विसरून पुन्हा नवीन ताकद,ईर्ष्या देत असते कारण त्या जेवणात सोबत आपली माणसे असतात.मग ती रक्ताची असो वा नसो.
त्यामुळे मी एवढंच सांगेन की आवश्यक गरजा आणि चोचले,मोह,हव्यास ह्यात खूप फरक आहे.आपण कशामागे पळायचे हे आपण ठरवायचे असते.आणि कायम 1 विचार नक्की केला पाहिजे की अजूनही बाबा आमटेंसारखी लोक एकत्र कुटुंबपद्धतीचा अवलंब करत आहेत. पण त्यात सगळ्यांना त्यांचे त्यांचे स्वातंत्र्य दिले जाते व्यक्त व्हायला आवडीनिवडी जपायला.जे हवं ते करा पण एकत्र कुटुंबात राहून करा.आणि हे शक्य तेव्हाच आहे जेव्हा घरचा support असतो..ह्याचा अर्थ माणसाने माणसाला समजून घ्यावे.हाच आताच्या काळात एकत्र कुटुंबासाठीचा सोपा उपाय आहे.जो आपल्या ego मुळे कठीण होतो..परंतु शेवटी वर जाताना पैसा नाही तर आनंद,समाधान घेऊन जायचे आहे.तोही निस्वार्थी!तुम्हाला कोणता आनंद हवा आहे? पैशाचा की माणुसकीचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.हा पण पैशाचा आनंद हा तात्पुरता असतो,आणि कष्ट सुद्धा आयुष्यभर करावे लागतात.परंतु माणुसकीचा आनंद कमवायला सुरवातीला मेहनत घ्यावी लागते अंतर connection झाले की दोन्ही side ला कष्ट विभागले जातात.आणि फळ सुद्धा लगेच मिळते जे जीवनभर पुरु शकते. त्यामुळे शून्य खर्चात अमूल्य असा ठेवा आपल्याला मिळू शकतो आणि त्याची सुरवात खूप पूर्वीच झाली आहे एकत्र कुटुंब पद्धतीच्या सहभोजनातून.फक्त मधल्या काळात विसर पडला होता तो आधुनिक रुपात पुन्हा सुरू झाला आहे.पुन्हा एकदा नव्याने एकत्रित कुटुंबपद्धती अवलंबली जात आहे.आणि घरचे कुटुंब बाहेरचे कुटुंब असे न राहता माणुसकीचा परिवार,माणुसकीचे कुटुंब निर्माण होण्याची गरज आहे.ते झाले तर आपोआप बाकीची कुटुंब पूर्ण होतील. आताचा lockdown हा ह्याच माणुसकीच्या परिवारासाठी मोठी संधी आहे..सुरवात आपण घरापासून करायला हवी.कारण घरासाठी मिळालेला हा bonus time आहे.घरातले हरवलेले घरपण पुन्हा मिळू शकते,सहभोजनातून निखळ आनंद मिळू शकतो.फक्त ह्या संधीचे सोने करायला हवे.देवाने विभक्त झालेल्या लोकांना एकत्र आणण्यासाठी केलेली उपाययोजना असावी कदाचित त्याचा फायदा करून घ्या त्यातून पैसा नक्कीच मिळणार नाही पण समाधान, आनंद,माणुसकीचा अमूल्य ठेवा नक्की मिळेल.
चला तर मग परिवार नावाच्या बँकेत माणुसकीची ठेव ठेवूया.पहिली ठेव रक्ताच्या नात्याची नंतर बाकीची आपापल्या इतर कुटुंबाच्या ठेवी ठेवत जाऊया आणि जीवनभर त्याचे व्याज आनंदाने अनुभवूया!
एकत्र रहा,आनंदी रहा!
लेखिका,
कु.प्रणाली उदय गोगटे
(शिक्षिका,माध्यमिक विभाग)
एम.ए.संस्कृत,बी.एड, DSM
भारतीय विद्या भवनची सुलोचना नातू विद्या मंदिर,पुणे.
●संपर्क – ९०२८५६३०८०