ऑक्सफर्ड व्हॅक्सिन….!!!
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये संशोधित झालेली आणि AstraZeneca या कंपनीच्या साहाय्याने विकसित केलेली कोरोना-व्हायरस लस पहिला अर्धा डोज दिल्यानंतर ७०% आणि २१ दिवसांनंतर दुसरा पूर्ण डोज दिल्यानंतर ९०% परिणामकारक (Efficient ) आहे. जवळपास २३००० निरोगी लोकांच्यावर चाचणी केल्यानंतर AstraZeneca आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीनेआज रिजल्ट्स जाहीर केले. याआधी Pfizer या कंपनीची लस ९०% तर Moderna या कंपनीची लस ९५% परिणामकारक (Efficient ) आहेत. Pfizer या कंपनीची लस हि वजा ७० (-70°C ) तापमानाला स्टोर करावी लागते तर Moderna या कंपनीची लस हि वजा 20 (-20°C ) डिग्री तापमानाला स्टोर करावी लागते. ऑक्सफर्डची लस मात्र अधिक २-८ (2-8 °C ) डिग्री तापमानाला, म्हणजेच आपल्या घरातील रेफ्रिजरेटर मधील तापमानलासुद्धा स्टोर करता येते. Pfizer कंपनीच्या लसीच्या एका डोजची किंमत जवळपास ३५ डॉलर (२५०० रुपये), Moderna कंपनीच्या लसीच्या एका डोजची किंमत जवळपास ३7 डॉलर (२7०० रुपये) तर ऑक्सफर्डच्या लसीच्या एका डोजची किंमत जवळपास 2 डॉलर (150 रुपये) असेल. मार्च महिण्यापर्यंत भारतामध्ये ऑक्सफर्ड, Pfizer आणि Moderna या आणि अजून २ ते ३ कंपनीच्या लसी उपलब्ध होतील, भारतामध्ये विकसित होत असलेल्या (Bharat -Biotech ) या कंपनीच्या लसीचे परिणाम अजून जाहीर झालेले नाहीत. २०२१ च्या डिसेंबर महिन्यापर्यंत ऑक्सफर्डच्या लसीचे ३०० कोटी डोज दिले जातील. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या ‘ना नफा ना तोटा’ या नियमानुसार ऑक्सफर्डची लस सर्व कंपन्यांना (AstraZeneca यूरोपमध्ये आणि Serum Institute भारतमध्ये) तसेच इतर विकसित देशामध्ये (आफ्रिकन देश, बांगलादेश, ब्राझील ) कमीत कमी किमतीत उपलब्ध करून द्यावी लागेल. सर्वात महत्वाचे म्हणजे ऑक्सफर्डची लस 70 वर्षावरील वृद्ध व्यक्तींना कोरोना होण्यापासून ९९% संरक्षण देतेय. ऑक्सफर्डची लस सारा: गिल्बर्ट आणि अँड्रू पोलार्ड या शास्त्रज्ञांनी Medical Science Division मध्ये विकसित केलीअसून, Pfizer कंपनीची लस जर्मनीमध्ये उगर शाहीन आणि त्यांची पत्नी झलेम तूरेस यांनी University of Mainz / BioNTech मध्ये विकसित केली आहे, तर Moderna कंपनीची लस अमेरिकेतील मॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ( MIT ) मध्ये विकसित केली आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या माहितीनुसार पुढच्या टप्पयात या लसीचे परिणाम अजून ६०००० लोकांच्यात तसेच कॅन्सर, डायबिटीज, हृदयरोग, कावीळ याप्रकारचे आजार असणाऱ्या पेशन्टवर पहिले जातील, यामध्ये भारत, जपान, ऑस्ट्रोलिया, जपान, अमेरिका, केनिया या देशांचा समावेश आहे. सध्या जगातील १० देशामध्ये ऑक्सफर्डच्या लसीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन (Large scale production ) सुरु आहे.
![Nanasaheb Thorat](http://www.mahaedunews.com/wp-content/uploads/2020/11/nansaheb-thorat-218x300.jpg)