पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात प्रदूषण नियंत्रण जाणीव जागृतीसाठी आयोजित कार्यक्रमात बोलताना पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे खजिनदार मा. ॲड. मोहनराव देशमुख यांनी वरील उद्गार काढले. समाजामध्ये प्रदूषणाची गंभीरता माहिती व्हावी, विद्यार्थ्यांनी या संबंधीची जाणीव जागृती निर्माण करावी या हेतूने राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिनाच्या निमित्ताने प्रातिनिधिक स्वरूपात वृक्षपूजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे खजिनदार मा. ॲड.मोहनराव देशमुख, सहा. सचिव मा. ए. एम जाधव, विज्ञान अधिष्ठाता डॉ. एम.जी. चासकर तसेच प्राचार्य डॉ पंडित शेळके, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नितीन घोरपडे, राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक डॉ सविता कुलकर्णी, पर्यावरण शास्त्र विभाग प्रमुख डॉ मंगेश देशपांडे कार्यालय कर्मचारी आणि शिक्षक उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ सविता कुलकर्णी यांनी प्रदूषण समस्या, त्याची गंभीरता व जाणीव जागृती यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. डॉ. नितीन घोरपडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना २ व ३ डिसेंबर १९८४ साली झालेल्या भोपाळ वायू दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या स्मृतीप्रीत्यर्थ हा दिवस साजरा केला जात असल्याचे सांगितले. मा. मोहनराव देशमुख यांनी समाजामध्ये जनजागृती गरजेची असून विद्यार्थ्यांनी हे काम पुढे न्यावे असे आवाहन केले.
मा. ए. एम. जाधव यांनी उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आणि महाविद्यालयातील झाडांची काळजी घेणारे श्री. चांगदेव पोमण यांच्या हस्ते झाडांचे पूजन केले. तसेच इ वेस्ट कलेक्शन सेंटर मध्ये महाविद्यालयातील संगणक कचरा टाकण्यात आला.
कार्यक्रमाचे नियोजन डॉ सविता कुलकर्णी, श्री पवन कर्डक, श्री. चांगदेव पोमण यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नितीन घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली केले.