आनंदी आयुष्याची गुरुकिल्ली भाग 1 : वर्तमानात राहण्याची शक्ती या मागील भागात आपण वर्तमानात कसे राहायचं व ते आनंदी जीवनासाठी किती महत्वाचे आहे हे पाहिले.
नंतरचा भाग दोन:नातेसंबंध: अध्यात्मिक पद्धत यामध्ये आपण आनंदी जीवनासाठी आपले नातेसंबंध निकोप व प्रेमळ असे असणे गरजेचे आहे व नातेसंबंध कसे वृद्धिंगत करायचे याची अध्यात्मिक पद्धत पाहिली.
एकहर्ट टोले लिखित प्रॅक्टिसींग द पाॅवर ऑफ नाॅऊ या इंग्रजी पुस्तकातील तिसऱ्या भागाचा: स्वीकृती व आत्मसमर्पण सारांश आज आपण पाहणार आहोत. वाचकांना हा सारांश भाग आवडेल व त्यांच्या आयुष्यात निश्चितच सकारात्मक बदल जाणवतील असे मला वाटते. आयुष्यामध्ये यश-अपयश ,सुख- दुःख हे येत असतात तेव्हा आपले विचार कसे असावेत,आपले आचरण कसे असावे हे अतिशय सुंदर रित्या,रोजच अनुभवास येणारी छोटी छोटी उदाहरणे देऊन आपल्याला स्पष्ट केले आहे. याचा निश्चितच आपल्याला रोजच्या जीवनात उपयोग होईल.
स्वीकृती व आत्मसमर्पण
जीवनामध्ये यश व अपयशाचे चक्र चालू असते यशामध्ये भरभराट होते, अपयशामध्ये ऱ्हास होतो. नवीन गोष्टी करण्यासाठी हे चक्र असावे लागते. जर तुम्ही एकाच गोष्टीला चिटकून राहिलात, जीवनातील प्रवाहाला विरोध केलात तर दुःखी होता. भरभराट होण्यासाठी काही गोष्टी/ कृती सोडून देण्याची गरज असते. एक चक्र संपल्याशिवाय दुसरे सुरू होत नाही. उतरते चक्र किंवा अपयश हे अध्यात्मिक परिपूर्तीसाठी आवश्यक असते. प्रत्येक यशाच्या आड अपयश अडलेले असते व प्रत्येक यशामागे यश दडलेले असते. यश व अपयश दोन्ही शाश्वत नसतात. ती तुमचे “जीवन -आवस्था” आहे, जीवन नाही. कोणतेही चक्र हे काही तासांपासून ते काही वर्षांपर्यंत असू शकते. जोपर्यंत मनामध्ये परिस्थिती छान असते ती तुम्हाला आनंदी करते, तुम्हाला छान वाटते आणि ती तुमचा भाग बनते. एकतर परिस्थिती संपते किंवा बदलते किंवा एकदम परस्परविरोधी गोष्टी/ घटना घडतात.एखादी घटना जी काल आनंददायी होती तीच घटना आज दुःखदायक ठरते. म्हणजे एकाच वस्तुस्थितीत आनंद व दुःख असते परंतु वेळेमुळे त्या बदलतात.
जीवनात विरोध करायचा नसेल तर कृपा, समाधान ,हलकेपणा या स्थितीत असणे आवश्यक आहे. या स्थितीत आपण “चांगले किंवा वाईट” यावर अवलंबून रहात नाही त्यामुळे यश – अपयश येतील जातील परंतु आपण अवलंबून असल्यामुळे काही हरवण्याची भिती नसते व जीवन सहज होते. आपल्यामधील आंतरिक विरोध म्हणजेच नकारात्मक भावना. आंतरिक विरोध व नकारात्मक भावना समानार्थी शब्द आहेत. नकारात्मक भावना म्हणजे चिडचिडपणा किंवा उतावळेपणा पासून ते उग्र राग, उदासीनता किंवा सुस्तपणा ते आत्महत्या पर्यंत निराशा. एकदा तुम्ही या नकारात्मक भावनेत अडकला की तुम्हाला सकारात्मक बदल नकोच वाटतो.तुम्ही सकारात्मकतेकडे दुर्लक्ष करता हे सर्वसामान्यपणे घडते. हे विवेकशून्य किंवा वेडेपणा आहे. जर आजूबाजूची झाडे किंवा प्राणी पाहिलेत तर ते सुद्धा शिकवतात, या क्षणाला शरण जा. जोपर्यंत तुम्ही नकारात्मक भावनेत असाल तर लक्षात घ्या की हा संकेत आठवण देत आहे की, वर्तमानात राहा,जागे व्हा मनाच्या राज्यातून बाहेर या, वर्तमानात रहा.अगदी छोटीशी चिडचिड कबूल करा. लक्षात घ्या नाहीतर निरीक्षण न केलेल्या प्रतिक्रिया वाढतच राहतील. नकारात्मक भावना काढून टाकण्यासाठी अजून एक करता येईल जर बाह्य कारणांमुळे प्रतिक्रिया होते तर बाह्य कारणांची स्पष्ट स्वच्छ कल्पना करा व त्या तुमच्या मनातून काढून टाका. तुम्ही घरात शांत बसले आहात परंतु रस्त्यावरील गाडीचा आवाज /हाॅर्न ने तुम्ही चिडला परंतु चिडण्याचे कारण काय? तुम्ही का लक्ष देता? चिडचिड का करता? चिडचिड मनात निर्माण झाली आपोआप जाणीव नसताना मनाने प्रतिकार केला व नकारात्मक भावना दुःख निर्माण झाली हा भ्रम आहे. ही निर्माण झालेली नकारात्मक भावना किंवा प्रतिकार मूळ कारणापेक्षा खूप जास्त त्रासदायक आहे. त्यामुळे स्पष्ट विचार करा व मनातील ही प्रतिमा/ विचार काढून टाका. ही अध्यात्मिक पद्धत आहे. तुम्ही स्वतःचे विचार स्पष्ट ठेवा कोणतेही कारण तुम्हाला त्रासदायक होणार नाही. अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करा जसे की, गाडीचा हॉर्न , कुत्र्याचे भुंकणे,मुलांचा गोंधळ, ट्राफिक जाम इत्यादी सर्व गोष्टी घडू देत परंतु त्याचा तुमच्यावर त्रासदायक किंवा नकारात्मक परिणाम होता कामा नये. कोणी तुमच्याशी उर्मटपणे बोलले किंवा तुम्हाला दुखावले तरी प्रतिक्रिया देऊ नका. असे समजा की तुम्हाला कोणीच दुखावले नाही. याला क्षमा म्हणतात. अशाप्रकारे तुम्ही बिनतोड/ अभेद्य बनताल. अजून एक पद्धत म्हणजे शांतता शोधू नका तुम्ही आहे त्याच परिस्थितीत रहा नाहीतर तुमच्या मधील गोंधळ व जाणीव नसलेला प्रतिकार वाढत जाईल. शांततेत नसल्याबद्दल स्वतःला क्षमा करा. तुम्ही तुमच्या मधील अशांततेचा स्वीकार कराल, तुमची अशांतता शांततेत परावर्तित होईल. ज्याचा तुम्ही पूर्णपणे स्वीकार करतात ती गोष्ट तुम्हाला शांततेकडे घेऊन जाईल. हा समर्पणाचा चमत्कार आहे. हे जेव्हा तुम्ही स्वीकारतात तेव्हा प्रत्येक क्षण हा उत्तम असेल. यालाच म्हणतात आत्मज्ञान. निसर्ग आपल्याला दया शिकवितो. मनातील विरोधाच्या पलीकडे गेल्यावर तुम्ही खोल सरोवरा सारखे असता. जीवनाची बाह्य परिस्थिती ही सरोवराच्या पृष्ठभागा सारखी कधी शांत, कधी वादळी,कधी खळखळणारा, ऋतू व हवामानाप्रमाणे असते. परंतु खोलवर मात्र सरोवर शांत असते. तुम्ही पूर्ण सरोवर आहात फक्त पृष्ठभाग नाही, तुमच्या स्वतःच्या अंतरंगाला स्पर्श करून.
सकारात्मक बदल घडविण्यासाठी “आत्मसमर्पण” फार महत्त्वाचे आहे. काही लोकांना आत्मसमर्पण म्हणजे काही नकारात्मक गोष्टी वाटतील. जसे की पराभव, सोडून देणे ,जीवनातील आव्हाने स्वीकारण्यास असमर्थ, आळशी बनणे इत्यादी. खरे आत्मसमर्पण वेगळे आहे याचा अर्थ असा नाही की जीवनात उद्भवलेले प्रश्न निष्क्रिय पणे सोडून देणे. आत्मसमर्पण म्हणजे साधे परंतु प्रगल्भ (विद्वत्तापूर्ण) शहाणपण की जे जीवनाचा प्रवाह चालू ठेवते विरोध करीत नाही. वर्तमान ही एकच जागा अशी आहे की जेथे तुम्हाला जीवनाचा प्रवाह अनुभवण्यास मिळतो. म्हणून आत्मसमर्पण म्हणजे विनाअट वर्तमानाचा स्वीकार करणे. आत्मसमर्पण म्हणजे आंतरिक प्रतिकारावर पाणी सोडणे ,त्याग करणे. आत्मसमर्पण हे पूर्णपणे आंतरिक घटना आहे, बाह्य किंवा वरवर राहून तुम्ही गोष्टी सोडू शकत नाही किंवा बदलू शकत नाही. नकोशी किंवा नावडती जीवन अवस्थेचा तुम्ही स्वीकार करण्याची गरज नसते. अशा गोष्टींविषयी तुम्ही काही चुकीचे आहे असे म्हणण्याची गरज नाही, म्हणू नका. तुम्ही लक्षात घ्या की तुम्हाला यातून बाहेर पडावयाचे आहे. अशावेळी तुम्ही तुमचे लक्ष फक्त वर्तमान क्षणावर केंद्रित करा. मनात कोणतेही लेबलिंग (नामांकन) करू नका.म्हणजेच वर्तमानाचे काही परीक्षण केले नाही त्यामुळे तेथे प्रतिकार किंवा नकारात्मक भावना नाही.तुम्ही वर्तमान क्षणाचे अस्तित्व स्वीकारले आहे नंतर तुम्ही या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी जी काही कृती करायची ती करा. रागात, बेचैनीत किंवा निराशेमध्ये घेतलेल्या नकारात्मक कृती पेक्षा ही कृती खूप परिणामकारक असेल. तुम्हाला हवा असलेला अपेक्षित निकाल / परिणाम मिळेपर्यंत वर्तमान क्षणाचा स्वीकार करा, आत्मसमर्पण करा. ही पुनरावृत्ती चालू ठेवा. आत्मसमर्पण न केल्यामुळे तुमची मानसिकता अभिमान अधिक दृढ होतो व परकेपणाची भावना जास्त बलवान होते.निसर्ग सुद्धा तुमचा शत्रू होतो. तुम्ही घाबरता बर्याच वेळा तुम्ही मनोविकृत बनता.फक्त मानसिकच नाही परंतु शारीरिक दुष्परिणाम होतात. शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर तणाव/ ताठपणा उत्पन्न होतो, शरीर आकुंचन पावते /आखडते, शरीरातील शक्तीच्या मुक्त प्रवाहास प्रतिकार केला जातो.तुमची जीवन अवस्था असमाधानकारक किंवा असहाय्य असते तेव्हा प्रथम आत्मसमर्पित होऊन निर्माण झालेला प्रतिकार थांबविणे, मोडून काढणे. आत्मसमर्पित भावनेमध्ये पूर्ण वेगळी गुणवत्तापूर्वक शक्ती असते. अगदी प्रामाणिक राहून, तुम्ही खरंच सर्व मानसिक भावना मनातून सोडून दिल्या आहेत हे पाहिले पाहिजे. अचानक तुम्हाला खूप हलके, स्वच्छ, स्पष्ट व खोलवर शांतता वाटू लागल्यास तुम्ही निश्चितच आत्म समर्पित भावनेत आहात.आता तुमच्याकडे विरोधी भावना नसताना समोरच्या व्यक्तीच्या भावनांकडे लक्ष द्या.तुमच्यामध्ये मीपणाची भावना नसेल तर तुमच्या मधील संवाद खरा ठरेल. जेव्हा तुम्ही पूर्णपणे वर्तमानात असाल तेव्हा “काहीच न करणे” हा एक परिस्थिती व लोकांमध्ये परिवर्तन घडवून आणण्याचा शक्तीशाली मार्ग आहे. “काहीच न करण्याचा” खरा अर्थ आहे आंतरिक विरोध नसणे व तेव्हा सतर्कता असणे. जर कृती आवश्यक असेल तर तुम्ही तुमच्या सवयी च्या मनातून नाही तर जाणीव वर्तमानातून प्रतिसाद देतात. यावेळी तुमचे मन हे अहिंसा व संकल्पना पासून मुक्त असेल. तुमचा स्वाभिमान सांगतो की तुमचा प्रतिकार म्हणजे शक्ती आहे. परंतु प्रतिकार तुम्हाला अस्तित्वापासून दूर ठेवतो. अस्तित्व (being) तुमची खरी शक्ती असते. आत्मसमर्पण मध्ये खोटा बचावात्मक स्वाभिमान ,गर्व व खोट्या मुखवट्याची गरज नसते. गर्व म्हणतो की साधे व सरळ राहणे धोकादायक असते, तुम्हाला दुखापत होईल तुम्ही असुरक्षित बनाल. गर्वास हे माहीत नसते ती प्रतिकार सोडून देण्याने खरी व आवश्यक सुरक्षितता मिळते.
आत्मसमर्पण म्हणजे मनात काहीही मागे न ठेवता परिस्थितीला स्वीकृत करणे. आजारपण हा “जीवन अवस्थेचा” भाग आहे. त्याला भूतकाळ व भविष्यकाळ आहे. वर्तमानावर लक्ष केंद्रित करून व मनातील विचारांपासून परावृत्त होण्यामुळे आजारपण हे शारीरिक दुखणे, अशक्तपणा, अस्वस्थता, दुबळेपणा इत्यादी प्रकारानुसार हे कमी होते. दुःखाला चालू वर्तमान क्षणात जाणीव करा. आत्मज्ञानासाठी उपयोग करा.आत्मसमर्पण तुम्हाला बदलावीते. जेव्हा तुम्ही बदलता, पूर्ण जग बदलते कारण जग म्हणजे तुमचे प्रतिबिंब. आजारपण हा प्रश्न नाही, प्रश्न आहे तो गर्विष्ठ मनाला आवरण्याचा. जेव्हा तुम्ही आजारी किंवा अक्षम बनता तेव्हा स्वतःला अपराधी समजू नका. आपल्यावर अन्याय होतोय म्हणून स्वतःला किंवा आयुष्याला दोष देऊ नका. हा सर्व प्रतिकार / विरोध आहे. तुम्हाला काही मोठा आजार असेल तर त्याचा आत्मज्ञानासाठी उपयोग करा.आयुष्यात जे काही वाईट घडेल त्याचा आत्मज्ञानासाठी उपयोग करा. आजारपणा पासून माघार घ्या. त्याला भूतकाळात किंवा भविष्यकाळाशी जोडू नका. त्यातून बळजबरी वर्तमानाकडे व जागृती कडे परावृत्त व्हा. बघा काय घडते. किमयागार बना. मूलभूत धातु सोन्यामध्ये, दुःख जाणीवेमध्ये व आपत्ती आत्मज्ञानामध्ये परावर्तित करा. जेव्हा एखादी आपत्ती येते किंवा काहीतरी गंभीर गोष्ट घडते जसे की आजार, अपंगत्व, घर किंवा एखादी मालमत्ता जाते, जवळचे नातेसंबंध बिघडतात, प्रिय व्यक्तीचा मृत्यू होतो किंवा त्याला दुःख यातना होतात, स्वतःचा मृत्यू जवळ येत असतो लक्षात घ्या या गोष्टीला दुसरी बाजू असते काहीतरी अविश्वसनीय घडणार असते/ घडण्याचा जवळ असतात. दुःखाचे किंवा आजाराचे मूळ सोनेरी क्षणात रूपांतरित होण्याची किमया होते. ती पायरी म्हणजे आत्मसमर्पण. याचा अर्थ असा नाही ही पूर्ण आनंदी आनंद होईल. तसे होणार नाही परंतु भिती व यातना चे रूपांतर आंतरिक अशांतता व प्रसन्नतेत होईल. ही शांतता मुक्ती पासून निर्माण झालेली असेल. ही देवाकडील शांतता आहे की जिच्या पुढे आनंद म्हणजे काहीच नाही या तेजस्वी शांतते मधून तुमच्या अस्तित्वाची परिपूर्ती जाणवेल. तुम्ही अविनाशी व अमर आहात हा फक्त विश्वास नाही तर निश्चितच खात्री आहे. त्यासाठी बाह्य पुराव्याची गरज नाही. काही टोकाच्या परिस्थितीमध्ये तुम्ही वर्तमानाचा विचार करू शकत नसाल तर दुसरा मार्ग म्हणजे आत्मसमर्पण. त्या क्षणाच्या वास्तवाला/ खरेपणाला आत्मसमर्पित व्हा ही पहिली संधी. आहे माहित आहे की सर्व झाले आहे काही करू शकत नाही, तेव्हा जे आहे त्याला हो म्हणा व जे नाही त्याचा स्वीकार करा. त्यामुळे नकारात्मकता, दुःख, वेदना वाढणार नाहीत. तेव्हा तुम्ही विरोधाच्या भूमिकेत नसाल, औचित्याची जाणीव ,हलकेपणा असेल, संघर्ष नसेल. जर बाह्य गोष्टींना तुम्ही स्विकृत करू शकत नसाल तर आपल्या अंतरंगाला स्वीकृत करा. ही आत्मसमर्पणाची दुसरी संधी आहे. याचा अर्थ वेदनेला विरोध करू नका, ती असू देत. दुःख ,निराशा, भिती, एकटेपणा किंवा इतर कोणतेही दुःख असेल तर त्याला आत्मसमर्पित व्हा / शरण जा. मनात कोणतीही अढी निर्माण न करता साक्षीदार व्हा, संधी स्वीकारा, नंतर पहा चमत्कार समर्पणामुळे दुःख हे शांततेत परावर्तित होईल. ते तुमचे पुनरुत्थान व स्वर्गारोहण असेल. दुःखा पासून सुटका करण्यासाठी अनेक खोटे मार्ग आहेत व्यसन,राग,फेकून देणे, दडपशाही करणे इत्यादी परंतु ते तुमचे दुःख कमी करीत नाही. जाणीवपूर्वक गोष्टी करीत नाही तेव्हा दुःख कमी होत नाही. जेव्हा दुःखातून बाहेर येण्याचा मार्ग नसतो तेव्हा अजूनही काही माध्यमातून बाहेर येता येते म्हणून दुःखाकडे पाठ फिरवू नका., तोंड द्दा, पूर्ण अनुभव घ्या. त्याचा विचार करू नका.गरज असल्यास व्यक्त व्हा परंतु त्याचे चित्र मनात रंगवू नका फक्त पूर्णपणे अनुभवा.एखादी व्यक्ती, घटना ,परिस्थिती ज्याच्यामुळे दुःख निर्माण झाले तिकडे लक्ष देऊ नका.मनाला स्वतःचा बळी देऊ नका. स्वतःला अपराधी समजणे किंवा इतरांना त्याबद्दल सांगत राहण्यामुळे तुम्ही दुःखाला चिटकून राहता. तुम्ही दुःख अनुभवत रहा. तेव्हा पूर्ण सतर्क रहा.सुरुवातीला सर्व अंधारमय व वेगळे वाटेल. तुमचे लक्ष दुखण्यावर राहू दे.दुःख, भीती, एकटेपणा जे काही असेल ते अनुभवा,सतर्क रहा, वर्तमानात रहा, तुमच्या अस्तित्वा सोबत रहा, तुमच्या प्रत्येक पेशी सोबत रहा. असे करीत असताना तुम्ही अंधारातून प्रकाशाकडे याल. हिच तुमच्या जाणीव भावनेची ज्योत आहे. तुमचे पूर्ण लक्ष म्हणजेच पूर्ण स्वीकृती म्हणजेच आत्मसमर्पण. पूर्ण लक्ष दिल्यामुळे तुम्ही वर्तमानाच्या शक्तीत आहात. त्यामध्ये कोणताही विरोध जिवंत नसेल, वर्तमान काळाला बदलूउन टाकतो. काळ नसल्यामुळे दुःख नाही व नकारात्मकता सुद्धा नाही. दुःखाचा स्वीकार करणे म्हणजे मृत्यूकडे प्रवास आहे. खूप यातना सहन करायच्या व त्याकडे लक्ष केंद्रित करायचे म्हणजेच जाणीवपूर्वक मृत्यू मध्ये प्रवेश करणे .जेव्हा तुम्ही या मृत्यूचा अनुभव घेता तुमच्या लक्षात येते की मृत्यू नाही आणि काहीच भीती सारखे नाही फक्त गर्वाचा मृत्यू होतो.तुम्हाला सोपे मरण हवे आहे का? वेदना ,यातना नसलेले मरण हवे का ?तर मग प्रत्येक भूतकाळात मृत्यू घ्या आणि मग तुमच्या वर्तमानाचा जोरदार प्रकाश तुमच्या स्वतःमध्ये अनुभवा, जाणीवेने आत्मज्ञान मिळविणे म्हणजे भूतकाळ व भविष्यकाळ गोष्टींवर पाणी सोडा आणि वर्तमान हा तुमच्या जीवनाचे महत्त्वाचे केंद्र ठेवा. म्हणजेच वर्तमान स्थितीत राहणे म्हणजेच आहे त्याला ‘हो’ म्हणा म्हणजे तुम्हाला दुःख यातना होणार नाही. निवड किंवा पसंती म्हणजे जाणीव . जेव्हा तुम्ही मनापासून आणि अंगवळणी पडलेल्या पद्धती पासून वेगळे होता, या क्षणात येता तेव्हाच पसंती किंवा निवड सुरू होते.अध्यात्मात सांगायचे म्हणजे या क्षणाला पोहोचेपर्यंत तुम्ही जाणिवेत नसता. कोणीही अकार्यक्षम, गोंधळ, दुःख हा वेडेपणा निवडत नाही.जवळजवळ सर्व जण कमी-अधिक प्रमाणात आजारापासून दुःखी असतात. ज्या क्षणाला तुम्हाला हे समजेल तेव्हा तुमच्यामध्ये चिडचिड नसेल.कोणाच्या आजारावर तुम्ही कसे काय चिडणार? फक्त दया दाखवणे ही योग्य प्रतिक्रिया. जर तुम्ही दुःख /यातना जसे की भिती, गोंधळ प्रश्न आणि दुःख निर्माण करतात आणि अजाणीव अवस्थेत राहतात , जोपर्यंत तुम्ही भूतकाळातून तुमची स्वतःची भावना साध्य करणे सोडत नाही तोपर्यंत तुम्ही स्वतःला क्षमा करू शकत नाही.जेव्हा तुम्ही पूर्ण वर्तमानाची स्वीकृती करता तेव्हा भुतकाळ बंद होतो. भूतकाळाची तुम्हाला गरज राहत नाही. वर्तमान, चालूक्षण हिच गुरुकिल्ली आहे. प्रतिकार हा मनापासून वेगळा करता येत नाही. त्यामुळे प्रतिकारापासून सुटका म्हणजे आत्मसमर्पण. सर्व निवाडा किंवा नकारात्मकता विरघळते. अस्तित्वाचे क्षेत्र की जे मनामुळे अस्पष्ट होते ते उघडते. अचानक खोल शांतता निर्माण होते व अथांग शांतता अनुभवते. या शांततेत मोठा आनंद असतो. या आनंदात प्रेम असते आणि आंतरगाभ्यात पवित्र, अपरिमित असे काही असते की त्याला नाव देता येत नाही.
– प्रा.डॉ. राधिका सोमवंशी
विभाग प्रमुख,
गणित व संख्याशास्त्र विभाग
नूतन मराठा कॉलेज,
जळगाव (सेवानिवृत्त)