Struggle Must be Creative………
Physics मधून MSc केल्यानंतर लगेच मला एका इंजिनीरिंग कॉलेज वर Lecturer चा जॉब मिळाला, संस्थेने मी मागितलेल्या पगारापेक्षा दुप्पट पगार दिला होता. सुरवातीला अडखळत Lecturer घेणारा मी नंतर फक्त खडू आणि डस्टर घेऊन Lecturer ला जायचो. इंजिनेरींगचे बॅकग्राऊंड नसल्यामुळे मला इंजिनेरींगच्या मुलांचे culture आवडायचे नाही आणि त्यांना माझे. इंजिनेरींगला Physics फक्त एकाच सेमिस्टर असल्यामुळे विध्यार्थी पण तो विषय फार सिरिअसली घेत नव्हते, तरीसुद्धा त्याना मी स्ट्रिक्ट ठेवायचो, त्यामुळे माझे बरेच विध्यार्थी मला पाहताच रस्ता बदलायचे. एकदा तर प्रॅक्टिकलला एका मुलीवर रागावलो म्हणून ती प्रिन्सिपॉलना तक्रार करायला निघाली होती. एवढे असून पण विद्यार्थ्यंना इंटर्नलची इतरांच्यापेक्षा जास्त मार्क्स द्यायचो, जी मुलगी तक्रार करणार होती तिलासुद्धा २५ पैकी २४ मार्कस दिले होते. हुशार आणि सिन्सिअर मुलांना इंटर्नलला २५ पैकी २५ मार्क्स द्यायचे धाडससुद्धा मी केले होते. माझ्या विषयाचा रिझल्टपण इतरांपेक्षा चांगला असायचा……
अचानक एक दिवस मला समजले उद्यापासून माझी नोकरी गेलीया, माझ्या जागी दुसरे कोणीतरी घेतलेय……उद्यापासून माझी नोकरी गेली होती……समोर फक्त अंधकारमय भविष्य दिसत होते…..माझ्याकडे पीचडी किंवा सेट/नेट नव्हते….दुसरी नोकरी पण मिळणार नव्हती. दोन वर्षे प्रमाणिकपणे काम करून मलाच का काढले याचे कारणच समजले नाही. शेवटी धाडस करून प्रिन्सिपॉलना कारण विचारण्यासाठी त्यांच्या केबिन मध्ये गेलो. मला पाहिल्यावर चिडूनच म्हणाले का आलायस तू इथे….माझे सगळे शरीर थरथरत होते, बसण्यासाठी खुर्चीला हाथ लावणार तेवढ्यातच ते रागाने म्हणाले कुणाला विचारून खुर्चीवर बसतोयस……माझे शरीर अजूनच थरथराय लागले…एकदम मनात धस्स झाले, खूपच भीती वाटली. तसाच मी डोळयांत पाणी आणून केबिनधून बाहेर पडलो. नोकरी जाण्यापेक्षा प्रिन्सिपॉलने केलेला अपमान सहन झाला नाही,आयुष्यात एवढा मोठा अपमान कधीच झाला नव्हता, संपूर्ण दिवस मी रूम वर येऊन रडत होतो. त्या दिवशी एक निश्चय केला, एव्हढ्या उंचीवर जायचे कि आपल्याला पुन्हा कुणाची हे वाक्य बोलण्याची हिम्मत झाली नाही पाहिजे. पुन्हा असला दिवस आयुष्यात येऊन द्यायचा नाही.
काळ बदलला १५ दिवसांच्या आतमध्ये मला फेलोशिपसहित पीचडीला ऍडमिशन मिळाले. पुढे त्याच संस्थेच्या विद्यापीठातून मी पीचडी केली…..”and the rest is history”
लॉकडाऊन मध्ये कितीतरी लोकांना, माझ्या मित्रांना, असेच कुणीतरी एका रात्रीत नोकरीवरून काढून टाकलेय….अशीच कुणाचीतरी नोकरी गेलेली समजलेकि मला माझा तो दिवस आठवतो……कितीतरी बॉस लोकांनी स्वतःची नोकरी/कातडी वाचवण्यासाठी असेच लाखो लोकांना एका रात्रीत कामावरून काढून टाकलेय. ‘उद्यापासून पासून कामावर येऊ नकोस’ हे ऐकणे याच्यासारखा मोठा अपमान कोणता नसतो. माझ्या बऱ्याच मित्रांचा असाच जॉब गेलाय….त्त्यांच्यासमोर असेच अंधकारमय भविष्य आहे. मित्रांनो तुमचे हेही दिवस जातील. आपल्यला नोकरीवरून काढून टाकणारी संस्था किंवा कंपनी वाईट नसते, तेथील कोणीतरी स्वतःची कातडी वाचवण्यासाठी आपला बळी देत असतो, सगळीकडे सध्या हेच चालू आहे.
”अपमानाचा बदला घ्यायचा नसतो अपमान लक्षात ठेवायचा असतो”
काही वर्षांनी त्या प्रिंसिपलना सुद्धा एका रात्रीत नोकरी सोडायला लागली!
वेळ सगळयांना उत्तर देते, सगळयांचा हिशोब बरोबर करते, आपण फक्त त्या वेळेची वाट पाहायची असते.
Dr. Nanaso Thorat,
Marie Curie Fellow (Research Scientist)
Medical Science Division
UNIVERSITY OF OXFORD