गरुड़ महाविद्यालयाच्या NSS च्या शिबिरात (KBCNMU आव्हान चे पहीले कार्यक्रम अधिकारी) प्रा.डॉ.श्याम साळुंखे सरांच व्याख्यान ऐकुन आव्हान ला जाण्याचा पक्का निर्धार मनाशी केला. आणि पुढील वर्षाचा आव्हान येईपर्यंत प्रत्येक वेळी प्रा.जावळे सर आणि प्रा.दिनेश पाटील सरांना आठवण करून देणारे आम्ही तिघ्ं (मी ,जयेश आणि अक्षय), अखेर तिढा सुटला आणि महाविद्यालयाच्या वतीने आम्ही आव्हान ला जाणार असं शिक्कामोर्तब झालं. ठरल मग डॉ.दिनेश सरांनी फॉर्म भरून घेण्याची घाई आणि प्राचार्य डॉ.के.व्ही.पाटील साहेबांची सेवनिवृत्तीचा शेवटचा दिवस अशी एकंदर तारांबंळ असतांनाही आमचे फॉर्म आणि उर्वरित प्रक्रिया पूर्ण केली. आव्हान मधला ‘अ’ पण निट समजून-न घेतलेले आम्ही चक्क 10 दिवसांचा आव्हान यशस्वीपणे जगुण, शक्य होतील तितक्या आठवणी वेचुन आणन्याचं काम केलं.
राज्यस्तरीय शिबिराचा आम्हा 30 जणांचा (10 मुली+20मुलं+2 कार्यक्रम अधिकारी ) अश्या अनोळखी लोकां सोबत पहिला वहीला प्रवास. 4 जून रात्रीला सुरु झाला खान्देश ते पुणे प्रवास, ठिकाण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. सकाळी विद्यापीठात पोहोचताच नैसर्गिक सौंदर्याने नटलेलं पुणे विद्यापीठ आणि महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून आलेल्या शिबिरार्थिंसाठी राहण्यापासून ते जेवणापर्यंतच्या सगळ्या सर्वोत्तम सुविधा पाहून प्रवासाचा सगळा थकवा क्षणात दूर झाला. थाटामाटात आव्हानचा उद्गाटन सोहळा पार पडला. प्रशिक्षणास सुरुवात झाली NDRF च्या टीम मेंबर्स आणि विद्यार्थ्यांच्या जिल्हानिहाय तुकडीने ज्या त्या विभागाप्रमाणे प्रशिक्षण सुरु झाले. सुरुवातीचे 2 दिवसांत त्या वातावरणात सगळ न्याहाळायचं समरस होण्याचा प्रयत्न करायचा न करायचा तोच स्पर्धा आणि त्यासाठीची तयारी posters, banners, model, रॅली theme, वेशभूषा, इतरांपेक्षा वेगळ नविन्यपूर्ण वाटावं अश्या काही innovative ideas अशी सगळी जय्यत तयारी सुरु होतीच आणि दुसरीकडे पहाटेच्या Body Warmup पासून ते प्रशिक्षणात शिकलेल्या गोष्टींचा सराव, Knot practice, CPR techniques, MFR (body checkpoint) करण्यापर्यंत खुप थकुन जायचे सगळेजण म्हणून मग थकवा विसरायला लावणारी सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल ही असायची. Water rescue साठी देहु दर्शनाला जातांनाचे सगळ्यांचेच गमतीशीर किस्से व काय शिकलात त्याचे इंद्रायणीच्या तटावर झालेले प्रात्यक्षिक व् त्यातुन NDRF च्या शेख सर आणि मेजर थापा कडून मिळालेली प्रशंसा …क्या बात अप्रतिमच. MH-19 की तो बात ही अलग है म्हणनारे उदीतजी आणि सुनिलजी तिवारी सर नेहमी हेच म्हणायचे जलगांवकर आप तो सब में expert हो भाई…. त्यानंतर शनिवारवाड्या ची लांब पल्ल्याची रैली आणि त्यात चक्कर येवून बालगंधर्व नाट्यमंदिरा जवळ पडलेली मी, पण अश्या परीस्थितीतही 24 तास अत्यावश्यक सेवा पुरवणारे Ambulance वाले दादा कायम लक्षात राहण्यासारखेच (चिडचिड, तणाव असलं काही नाही). अजुन असे बरेचशे अनुभव आणि प्रसंगावधान सांभाळता सांभाळता प्रा. तोरवणे सर आणि प्रा.रावतोळे मॅडमांचे विशेष बोलणे खाणारे लीना आणि मी. त्याबरोबरच खानावळ ते होस्टेल च्या रस्त्याने घडलेल्या अगणित गमतीजमती ही.
त्याच वातावरणात शेवटचा दिवस कधी उगावला कळालंच नाही. एकीकडे निकालाकडे सर्वांच लक्ष लागलेलं आणि आम्ही मात्र आमच्या तंद्रितच.व्यासपीठावरून वरुन आधी विद्यापीठाच् नांव आणि मग त्या विद्यापीठसंदर्भातील व्यक्तीच् नांव कानावर पडू लागलं. त्यात क.ब.चौ.उ.म.वि.जळगांव, उत्कृष्ठ स्वयंसेविका @शुभांगी फासे@ जाहीर झालं. पाठोपाठचं पुन्हा क.ब.चौ.उ.म.वि.जळगांव ,उत्कृष्ठ स्वयंसेवक @हर्षल पाटील@ आणि उत्कृष्ठ महिला कार्यक्रम अधिकारी (धुळे) आणि शेवटी सर्वोत्कृष्ठ विद्यापीठ म्हणून @क.ब.चौ.उ.म.वि,जळगांव@ ला बहुमान मिळाला. हे यश फ़क्त हर्षल किंवा मी आमचं एकट्याच कधीच नव्हतं. (रनिंग करून पार जिव कासाविस झालेले नाहीत पार वैतागलेलेच आम्ही) आणि आमच्या सोबतच्या असणाऱ्या त्या 28 जणांच्या पाठिंब्याच होत.
पुरस्कार जाहिर झाल्यावर पायात चालण्यापुरत पण बळ नसणारी मी मात्र सगळ्यांचा उत्साह जल्लोष पाहून पुन्हा त्याच जोमाने चक्क नाचू लागले .नंतरच photo cession अविस्मरणीयचं. माझ्या आयुष्यातील माझं सगळ्यात मोठ(आकाराने) आणि मौल्यवान बक्षीस, @@ महाराष्ट्राची उत्त्कृष्ट स्वयंसेविका आव्हान 2016 पुरस्कार@@##Best volunteer all over Maharashtra AVHAN 2K16 ##… बघता बघता 4 वर्ष #आव्हान# च्या महापर्वाला पूर्ण झालीत, त्या पुरस्काराच्या आठवणीं बरोबरच अनोळखी चेहऱ्यानां नविन ओळख मला या camp ने दिली. NSS च्या माध्यमातून महाराष्ट्रभरातून आलेले मित्रमैत्रिणी, शिक्षक, NDRF staff असा सगळा परिवार मनात साठवणीच घर करुन आहेत.
त्यातून आमच्या 2016 च्या गोतावळयातील नंतर कोणी प्रशासकीय सेवेत रुजू झालं तर कोणी सैन्यात भर्ती झालं, कोणी सामाजिक संस्थेत आपलं योगदान देऊ लागलं, तर कोणी लेखक, कोणी कवी, कोणी रंगमंचावर वावरणारे कलाकार, कोणी शिक्षक अश्या सर्वचं क्षेत्रात आपआपली जबाबदारी चोख अगदी उत्तमरित्या पार पाडत आहेत. आजच्या परिस्थितीत आव्हान ने काय दिलं तर प्रत्येक स्वयंसेवकाला ज्याच्या त्याच्या क्षेत्रात घट्ट पाय रोऊन ऊभं राहण्याची जिद्द दिली.
SPPU आव्हान 2016 अनुभवलेल्या प्रत्येकाच्या खुप आठवणी आहेत, सगळ्यांना लिखाणातून व्यक्त होता येत नाहीत म्हणून दोघां तिघांच्या आग्रहास्तव हा या सगळ्या आठवणींना उजाळा देण्याचा मी केलेला छोटासा प्रयत्न…
(साभार – संपूर्ण MH-19 परीवार RED ARMY 2016)
यासोबतच नक्की बघा – https://youtu.be/I5iVMCFhePI
शुभांगी विठ्ठल फासे
“आव्हान – जगण्याला समृद्ध करणारा एक जादुई अनुभव “: शुभांगी विठ्ठल फासे
MahaEdu News
www.mahaedunews.com is a different educational website. It focuses distinctively on emerging as well as leading topics in education. It helps in delivering effective and collaborative solutions to strengthen vast educational system with the help of students, teachers and experts.