आदरणीय मा. कुलगुरू, प्राचार्य डॉ.अरुण अडसूळ सर हे नाव कानावर पडताच आणि नजरेसमोर येताच आदराने नतमस्तक व्हावं असं आपलं विनयशील, सद्सदविवेकी, हजरजबाबी सुहास्यवदन, सुसंस्कृत व्यक्तिमत्व. सरांचा आज वाढदिवस या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छामय लघुलेख…….✍️
बारामती येथील विद्याप्रतिष्ठानचे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात सन 2000-2001 या वर्षी मी प्रथम वर्ष कला शाखेत शिकत असताना सर तुम्ही प्राचार्य म्हणून या महाविद्यालयात नव्याने रुजू झाला. आम्हा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना तुम्ही दिलेलं “राष्ट्र उभारणीत युवकांचे योगदान “या विषयावरील व्याख्यान आज ही माझ्या चांगलं स्मरणात आहे. या व्याख्यानामध्ये सर तुम्ही आम्हा तरुणाईला प्रश्न केला होता. तरुण कोणाला म्हणतात?
यावर तरुणाईशी तुम्ही जे बोलत होता. तो शब्द ना शब्द जसाच्या तसा आज आठवतो आहे.
” अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवितो त्याला ‘तरुण’ म्हणतात. “
“लाथ मारील तिथे पाणी काढेल या हिमतीने जो वाटचाल करतो त्याला ‘तरुण’ म्हणतात.”
“जो वायूच्या वेगाने सुसाट जाऊन जो यश खेचून आणतो त्याला ‘तरुण’ म्हणतात.”
” काबाड कष्ट करण्याची धमक आणि खमक ज्याच्या नसानसात भीनलेली असते त्याला ‘तरुण’ म्हणतात.”
“अंधाऱ्या काळोखाला छेदत छेदत जो लखलखीत प्रकाश शोधून आणतो त्याला ‘तरुण ‘ म्हणतात.”
“अपयशाला पावलोपावली पायदळी तुडवीत जो यश खेचून आणतो त्याला ‘तरुण’ म्हणतात.”
” अशक्य हा शब्द ज्याच्या शब्दकोशात नसतो त्याला ‘तरुण’ म्हणतात.
सळसळत्या रक्ताला अशक्य असं काहीही नसतं. अशा आजच्या या तरुणाईने चंगळवादी दुनियेत भरकटत न जाता वास्तवाचे भान ठेऊन समर्पकपणे उच्च ध्येय डोळ्यासमोर ठेऊन आयुष्याला सामोरे गेले पाहिजे.
जो विध्यार्थी स्वतः पांघरलेल्या चादर आणि सतरंजीची घडी स्वतः घालतो. त्याच्याच आयुष्याची घडी सुरळीतपणे बसू शकते. ” नाणं ” कसं असलं पाहिजे…? तर ‘नाणं’ हे खणखणीत असलं पाहिजे. व्याख्यानातील अशा प्रेरणादायी अर्थपूर्ण वाक्यांनी मी कमालीचा प्रभावीत झालो होतो. अन् सर आपल्या वक्तृत्वशैलीचा फॅन झालो… !! आपल्या प्रभावशाली आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वाने माझ्यासारख्या अनेक विध्यार्थ्यांना भुरळ टाकली होती….. !!
त्याचेच फलित म्हणजे आज महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या आणि जगतातील विविध राष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सर आपले विध्यार्थी पोहचले आहेत. विविध क्षेत्रात मोठमोठ्या पदावरती यशस्वीरित्या विराजमान झाले आहेत.आपण विध्याप्रतिष्ठान महाविद्यालयातून दिलेल्या ज्ञानमय शिदोरीतून आपल्या विचारांचा वसा आणि वारसा मोठ्या अभिमानाने सांगत आहेत… याचे सारे श्रेय सर आपल्या व्यक्तिमत्वाला आणि आपल्या स्फुल्लिंग चेतवण्याच्या वक्तृत्वशैलीला जाते.
सर.,तुम्ही बारामतीच्या विध्याप्रतिष्ठान कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात प्राचार्य म्हणून रुजू झाला.या महाविद्यालातील आम्हा विध्यार्थी आणि प्राध्यापकांच्या भेटीला भारतीय हरित क्रांतीचे प्रणेते एम. एस. स्वामिनाथन, थोर शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर, गानकोकिळा, लता मंगेशकर,अनाथांच्या आई सिंधुताई सपकाळ, यशस्वी अष्टपैलू क्रिकेटपटू कपिल देव अशा जागतिक दर्जाची अनेक महान माणसं विध्याप्रतिष्ठान कॉलेजला आणलीत. त्यांना जवळून पाहता आलं, ऐकता आलं हे आमच्यासाठी अविस्मरणीय अशी ग्रेट भेट असंच होतं……!!
सर तुम्ही विध्याप्रतिष्ठान कॉलेजचा कायापालट घडवून संपूर्ण कॉलेजचा चेहरा मोहरा सातत्याने नवनवीन उपक्रम आणि प्रयोग राबवून बदलून टाकला. पुणे विद्यापीठाचे “उत्कृष्ट महाविद्यालय” , “उत्कृष्ट प्राचार्य ” अशा पुरस्काराने सन्मानित केले. हा सन्मान आमच्यासाठी खूप मोठा सन्मान होता. आज सर्वत्र बारामतीच्या “विध्याप्रतिष्ठान ” कॉलेजचा बोलबाला आहे. हा बोलबाला फक्त पुणे जिल्ह्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. तर तो सावित्रीबाई फुले पुणे विध्यापीठासह महाराष्ट्र व राज्यांतील आणि भारतातील अनेक नामांकित विद्यापीठांसह देशाबाहेरही गेला आहे.याचे सारे श्रेय हे सर तुमच्या नावीन्यमय गुणवत्तापूर्ण राबविलेल्या उपक्रम आणि नवकल्पकतेला दिले जाते.
सर… तुमच्याकडून वेळोवेळी मिळणाऱ्या मार्गदर्शनातून आम्हा विध्यार्थ्यांना खूप काही शिकायला मिळाले. कधी कधी माझ्यासारख्या अनेकांना प्रश्न पडतो की, सर तुम्ही पदार्थ विज्ञानाचे प्राध्यापक पण सर्वच विषयांमधील असणारी बारीक सारीक माहिती ही अनेकांना अचंबित करणारी अशीच आहे.
जिथं ज्ञानाची निष्ठा अन् शिक्षकांची प्रतिष्ठा असते ना. तिथंच खरं शिक्षण मिळत असतं. असं शिक्षण आम्हाला विद्याप्रतिष्ठान महाविद्यालयांतील आपल्या मार्गदर्शनाखालील सर्व प्राध्यापक गुरुवर्यांकडून मिळालं.
विध्याप्रतिष्ठान कॉलेजविषयी सर तुमच्याच शब्दात सांगायचं झालं तर….
“नकारात्मक कृतीचं सोडाच पण…. तशा विचारालाही इथं स्पष्ट नकार दिला जातो, केवळ व्यक्तिमत्वाचं सोडाच, चारित्र्यालाही इथं योग्य आकार दिला जातो” असं आपलं विध्याप्रतिष्ठान महाविद्यालय…..!!
बारामतीचं “माझं विध्याप्रतिष्ठान महाविद्यालय…माझा अभिमान” असं मोठ्या अभिमानाने नेहमी आम्ही विध्यार्थी सांगत असतो आपुलकी आणि आपलेपणाने….. !!
असं म्हटलं जातं… आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही उत्तुंग बिंदू असतात आणि त्यातील बहुतेक कुणीतरी दिलेल्या प्रोत्साहानामुळे घडलेले असतात. अशा माझ्यासारख्या अनेक बिंदूना प्रोत्साहित करण्याचे काम सर आपण आणि विध्याप्रतिष्ठान महाविद्यालयांतील प्राध्यापक गुरुवर्य डॉ. शामराव घाडगे, प्रा. राजेंद्र वळवी, प्रा. गणेश भामे (प्रथम वर्ष…एक वर्ष), डॉ. श्रीराम गडकर, डॉ. आनंदा गांगुर्डे, डॉ. राजाराम चौधर, डॉ. सुनील ओगले, डॉ. संजय खिलारे,डॉ. संजय सानप, प्रा. पंढरीनाथ साळुंखे, प्रा.मिलिंद काकडे, प्रा.अलका जगताप या गुरुवर्यांनी केले आहे. हे आवर्जून नमूद करावेसे वाटते.
सर.., आपला प्रत्येक क्षेत्रातील असणारा अनुभव आणि ज्ञान याचा आपल्या सहवासात येणाऱ्या प्रत्येक विध्यार्थी,प्राध्यापक सहकाऱ्यांना महत्वपूर्ण असा फायदाच झालेला आहे. आपल्या मार्गदर्शनातून मिळणारी ज्ञानशिदोरी पावलोपावली आयुष्याला मार्गदर्शन देणारी अशीच आहे. याचं अनेकजण तोंड भरून कौतुक करतात ना.. त्यावेळी आपल्या कार्य कर्तृत्वाचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो.
सर…, आपण एक उत्तम माध्यमिक शाळा शिक्षक, उच्च माध्यमिक शाळा शिक्षक,पदवी प्राध्यापक,पदव्युत्तर प्राध्यापक, उपप्राचार्य, प्राचार्य, संचालक,कुलसचिव, निबंधक, प्र-कुलगुरू, कुलगुरू
,महाराष्ट्र लोक सेवा आयोग सदस्य इत्यादी ही सर्व पदं ज्यांच्या नावाशी जोढली जातात ते नाव म्हणजे शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट चैतन्याचा यशस्वी झंजावात मा.डॉ.अरुण अडसूळ सर……. !!!
सर तुम्ही या अनेक उच्च पदांद्वारे कार्य करताना संपूर्ण शिक्षण क्षेत्राला एक नवीन दिशा दिली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील आपली कारकीर्द आपल्या संवेदनशील धाडशी व दूरगामी निर्णयांमुळे अत्यंत यशस्वी अशी ठरली आहे. आपल्या कार्यकर्तृत्वाला नेहमी मनःपूर्वक सलाम करावा असं आपलं अष्टपैलू वक्तिमत्व आहे.
सर आपण माध्यमिक स्तरावरून उच्च माध्यमिक, महाविद्यालयीन स्तरावर शिक्षक ते प्राध्यापक, प्राचार्य, कुलगुरू, प्रशासक, व्यवस्थापक अशी घेतलेली यशस्वी झेप ही अनेकांना दिशादर्शक आणि कमालीची प्रभावीत करणारी अशीच आहे. अशा आपल्या या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा सहवास, मार्गदर्शन माझ्यासारख्या अनेकांना मिळाले. याचा आम्हा सर्वांनाच कमालीचा अभिमान आहे.
सर आपण नेहमीच सातत्याने नाविण्यमय उपक्रमाचा अवलंब करण्याची धोरणं आखता आणि ती पूर्णत्वास नेहता हे आम्ही अगदी जवळून पाहिलं आहे. सर तुम्ही नाविण्यमय उपक्रम, प्रयोग हे कल्पक दृष्टीतून ज्ञानाच्या क्षेत्रात आजवर महाविद्यालया पासून ते विध्यापीठापर्यंत राबविले आहेत. याचा आज शिक्षण क्षेत्रासाठी जो आमूलाग्र गुणवत्ता पूर्ण बदल झाला आहे. याचे सारे श्रेय हे आपल्या नाविण्यमय कल्पकता व ठोस निर्णय प्रक्रियेला दिले जाते.
बारामतीचं असणारं “विध्याप्रतिष्ठान ” कॉलेज हे प्राचार्य डॉ. अरुण अडसूळ सरांचं कॉलेज ही ओळख सावित्रीबाई फुले पुणे विध्यापिठालाच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक विद्यापीठांना परिचित झालेली आहे. याचे सारे श्रेय एक प्राध्यापक, प्राचार्य, कुलगुरू आणि उत्तम प्रशासक म्हणून सर तुम्हाला जातं.
सर.., तुम्ही फेसबुकच्या माध्यमातून” सौरज्वाला”च्या माध्यमातून येणारं तुमचं एक एक कोटेशन हे मार्मिक विचारधारा आणि जगण्याचं नवं तत्वज्ञान सांगून जातं. नवीन उमेद आणि ऊर्जा देणारी आपली वैचारिकता सांगणारं “सौरज्वाला” हल्ली पावलोपावली माझ्यासारख्या अनेकांना कमालीची प्रेरणादायी ऊर्जा देऊन जाते… !!
सर तुमचा हा प्रवास सोलापूर जिल्ह्यातील करमाळा सारख्या तालुक्यातून अतिशय प्रतिकूल सामाजिक व आर्थिक परिस्थितीतून झालेला आहे. सर तुम्ही विध्यार्थी दशेत शिक्षण घेताना प्रचंड संघर्ष करीत परिस्थितीवर मात करून यशाच्या अतिउच्च शिखरापर्यंतचा प्रवास जिद्धीने केलेला आहे, तुमच्या या संघर्षमय कार्य कर्तुत्वाला मनापासून सलाम करावासा वाटतो.
सर….तुम्ही आजवर शिक्षण क्षेत्राला दिलेल्या दैदिप्यमाण योगदानाचा आम्हाला पावलोपावली सार्थ अभिमान वाटतो. एका ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्याने न्यूनगंडाची कसलीही तमा न बाळगता धैर्य, धाडस आणि धडाडीने पुढे जात शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य, कुलसचिव, विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य, कुलगुरू, महाराष्ट्र लोकसेवा आयोग सदस्य, अशी विविध पदे भूषवून ज्ञानदानाच्या क्षेत्रात अत्यूच्च अशी शिखरे पादाक्रांत केली आहेत.सर आपण शिक्षणक्षेत्राला दिलेल्या या भरीव स्वरूपाच्या योगदानामुळे शिक्षण क्षेत्राची उंची वृद्धिंगत झाली आहे. आपला हा सारा प्रवास दैदिप्यमान दिपस्तंभासारखा अनेकांना प्रेरणादायी दिशा देत राहिलेला आहे. सर, तुम्ही शिक्षण क्षेत्राकरिता वेळोवेळी घेतलेले निर्णय किती रास्त आणि हितकारक आहेत. याची प्रचिती आजही शिक्षण क्षेत्राला आणि या क्षेत्रात काम करणाऱ्यांना पावलपावली येते आहे.
सर, आपली दूरदृष्टी,निर्णय घेण्याची हातोटी, उत्कृष्ट प्रशासन व्यवस्थापन कौशल्ये याचे कौतुक आजही अनेकांच्या तोंडून होते आहे. ती खऱ्या अर्थाने तुम्ही भूषविलेल्या पदाची आणि केलेल्या कार्याची अनमोल अशी पावती आहे.
सर.., खरंच तुम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये फिनिक्स पक्षाप्रमाणे घेतलेली भरारी आम्हा विध्यार्थी आणि प्रध्याकांना पावलोपावली प्रेरणादायी ऊर्जा देऊन जाते. तुमचा विध्यार्थी या नात्याने सर आम्हाला आपला सार्थ अभिमान वाटतो……!!!
सर.., आपला हा आजवरचा प्रवास दैदिप्यमान असाच राहिला आहे. आपल्या या प्रवासात असंख्य विध्यार्थ्यांना आपले मार्गदर्शन लाभले.आज राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध क्षेत्रात आपले विध्यार्थी पोहचले आहेत. ते केवळ आपल्या ऊर्जादायी, प्रेरणादायी प्रोत्साहन आणि प्रेरणेमुळेच….. !!
‘गरिबी’ आणि ‘दारिद्र्य’ या लपवायच्या गोष्टी असूच शकत नाहीत…, ऐन उमेदित सबब सांगाणाऱ्याला उर्वरित आयुष्य कुडत कुडत काढावे लागते…, स्वयंमशिस्त,ध्येय, धडाडी, धाडस, धीर, धडपड, जिद्ध, जिगर, जल्लोष,वावटळ, तुफान, झंजावात अशा कितीतरी शब्दांनी आणि कोटेशननी “सौरज्वाला” आमच्या सारख्या विध्यार्थी, प्राध्यापकांना कमालीची प्रेरणा आणि प्रोत्साहन देऊन जातात.आपण वेळोवेळी केलेल्या वैचारिक मार्गदर्शनामुळे आपल्या माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांनी योग्य वेळी ध्येय निश्चित करून त्या ध्येयाच्या दिशेने यशस्वी वाटचाल करता आली आहे. सर तुम्ही नेहमीच सांगत आलात की, “ध्येय, धडाडी आणि धाडसाने धडपड करणारी माणसेच इतिहासाला कालाटणी देऊ शकतात.” याच प्रमाणे ध्येयाने प्रेरित होऊन निश्चित केलेल्या ध्येयाला यशस्वीपणे सामोरे जात गवसणी घालता आली. हे केवळ सर तुम्ही वेळोवेळी चेतवलेल्या स्फुलिंगामुळे व घालून दिलेल्या योग्य मार्गदर्शन आणि ज्ञान संस्कारांमुळेच…., असं आज मला अभिमानाने सांगताना कमालीचा मनस्वी आनंद होतो आहे.
सर तुम्ही आमच्या इतिहास विभागाच्या तृतीय वर्षाच्या समारोप प्रसंगी आम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी आणि पुढच्या प्रवासासाठी दिलेल्या मार्गदर्शन पर शुभेच्छा आजही माझ्या चांगल्याप्रकारे स्मरणात आहेत. सर तुम्ही म्हणाला होता, ” विध्यार्थी मित्रांनो, आयुष्याच्या बाजारात इथून प्रमाणपत्र घेऊन जाताना त्याची समाजाला आणि राष्ट्राला मदत झाली पाहिजे. ” किती उद्दात विचार सांगितला होता.याचा आज ज्यावेळी भूतकाळात डोकावून विचार करतो ना… त्यावेळी तो भूतकाळ सुद्धा किती वैभवशाली व प्रेरणादायी होता याची प्रचिती देताना कमालीची ऊर्जा देऊन जातो. सर आपल्या या समारोप प्रसंगीच्या आठवणींचा आपल्या सोबत आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या म्युझीसियम शेजारील वनस्पतीच्या सानिध्यात हिरवळीवर काढलेला फोटो हा विध्याप्रतिष्ठान कॉलेजच्या समारोप प्रसंगीच्या वैभवशाली आठवणींना उजाळा देतो आणि सोबत नाविन्याची ऊर्जाही देतो.
सर.., तुमच्या विचार संस्कार आणि तत्त्वज्ञानातून मिळणारी प्रेरणादायी “सौरऊर्जा” माझ्यासारख्या असंख्य विध्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार आणि एक नवीन ओळख देऊन गेली आहे. आमच्या सारख्या यशस्वी विध्यार्थ्यांच्या अनेक पिढ्या घडविण्यामध्ये सर आपला खूप मोठा वाटा राहिला आहे….
सर…,आपला विध्यार्थी म्हणून आम्हा प्रत्येकाला आपला सार्थ अभिमान वाटतो.खरंच सर तुमच्यासारखे थोर गुरुवर्य लाभायला पण खूप मोठे भाग्य लागते. ते भाग्य आम्हाला लाभले. याचा मनस्वी होत असलेला आनंद खूप खूप मोठा आहे.याची तुलनाच होऊ शकत नाही.
“आपल्या आयुष्यात अनेक माणसे येतात. पण सर तुमच्या सारखी काही थोर माणसं आपल्या आयुष्यात खूप महत्वाचे स्थान निर्माण करून देतात .”
सर… आपण प्राध्यापक, प्राचार्य, कुलगुरू, प्रशासक म्हणून सर्वोत्तम आहातच पण…माणूस म्हणून तितकेच ग्रेट आहात…. !!
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, बारामतीच्या विद्याप्रतिष्ठान कॉलेजचे प्राचार्य पद भूषविणारे आमचे आदर्श प्रेरणादायी प्रेरणास्थान, ऋषितुल्य गुरुवर्य आदरणीय डाॅ.अरुण अडसूळ सर यांचा आज वाढदिवस वाढदिवस… !!
सर, आपण आमचे प्रेरणादायी प्रेरणास्त्रोत,स्फूर्ती स्थान, मार्गदर्शक,आदर्श….!
वक्तृत्व,कर्तृत्व आणि नेतृत्व या सर्व क्षेत्रातील आपली छाप अमिट अशीच आहे…
प्रसन्न ,निरामय सूहास्याची उधळण करीत आपण जोडलेला व्यापक मित्रपरिवार व आपल्यावर तसाच उत्कटतेने प्रेम करणारा आपला उदंड चाहता विध्यार्थी, प्राध्यापक वर्ग ,..कूणालाही सहजतेने हे साध्य होत नाही.
अभ्यासूपणा,चिकीत्सा,सम्यक व स्वतंत्र दृष्टी,गुणग्राहकता,निकोप परखडपणा यारख्या अनेक विशेषणांनी यूक्त असलेले आपले अष्टपैलू व्यक्तित्व नेहमिच आम्हा सर्वांना कायम प्रभावित करीत राहिले.मार्गदायक ठरले.आपण आमचे समग्र जीवन पूलकीत केले आहे.ज्ञान दानाच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सर्वाना हवेहवेसे वाटणारे प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय मा. डॉ. अरुण अडसूळ सर
सर, तुमचे वेळोवेळी आजतोवर आम्हाला मिळणारं मार्गदर्शन कमालीची ऊर्जादायी, प्रेरणादायी प्रेरणा आणि स्फूर्ती देऊन जाते. प्रत्येक वेळी काही ना काही नवीन काही तरी करण्याची ऊर्जा देऊन जाते. खूप काही शिकायला मिळाले.सहज वाटलं की,सर आपल्या व्यक्तिमत्वाविषयी मला जे भावलं ते शब्दबद्ध करण्याचा मी अल्पसा असा प्रयत्न केला आहे. तुमच्या व्यक्तिमत्वाविषयी खूप काही सविस्तरपणे लिहण्यासारखे आहे.
शेवटी जाता जाता आपल्यविषयी इतकंच म्हणावंसं वाटतं की,
” मोठ्या लोकांच्या शेजारी उभं राहिलं म्हणजे मोठं होतं कि नाही ते माहित नाही….पण आपल्या सारख्या चांगल्या लोकांच्या सोबतीत राहून नक्कीच मोठं होता येतं. प्रत्येक वेळी नवीन काही शिकता येतं”
असंच काहीसं मला भावलेलं आपलं प्रेरणादायी, ऊर्जादायी, स्फूर्तदायी व्यक्तिमत्व आहे.
सर आजच्या आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने शब्प्रपंच…….✍️
आदरणीय कुलगुरू डॉ.अरुण अडसूळ सर,
माणसं जोडणं म्हणजे काय, हे कुणी तुमच्या कडून शिकावं अस तुमचं सर्वव्यापी व्यक्तिमत्व !
माणसं जोडण म्हणजे माणसं वापरनं नव्हे तर … त्यांना आपल्या स्वप्नामध्ये सहभागी करून घेणं, माणसं जोडणं म्हणजे व्यक्ती व्यक्ती जोडून समष्टीच्या कल्याणासाठी समविचारी माणसांच्या मनाची गुंफण करून त्यांच्यातील ऊर्जा सकारात्मक, रचनात्मक आणि विधायक कामासाठी योग्य वापर करणं..
सर, तुम्ही नेहमीच या स्वभाव वैशिष्टयांसह कार्यरत असता त्यामुळे तर आमच्या सारखे अगणित विध्यार्थी प्राध्यापक तुम्हाला आदर्श मानतात, तुम्हा पासून स्फूर्ती घेतात….
“ज्यांचा एक एक शब्द ठरतो
असंख्य तरुणांचे प्रेरणास्थान
ज्यांची प्रत्येक कृती घडविते
तरुणांचे उज्ज्वल भविष्य
ज्यांचा प्रत्येक निर्णय ठरतो
शिक्षण क्षेत्रासाठी अनमोल रत्न”
सर असे आपले कर्तृत्व, नेतृत्व, वक्तृत्व आणि दातृत्व हे आम्हा विध्यार्थी आणि प्राध्यापकांना दीपस्तंभाप्रमाणे दृढता, प्रकाश, व समर्पक अशी प्रोत्साहनपर प्रेरणादायी दायी, ऊर्जादायी दिशा देत राहील….. !!
माणसाला माणूस गुंफणाऱ्या आदरणीय प्राचार्य डॉ. अरुण अडसूळ सर यांना “काळजाच्या प्रत्येक ठोक्याकडुन, श्वासाच्या प्रत्येक स्पंदकाडुन, रक्ताच्या प्रत्येक थेबांकडुन अन आयुष्यातील प्रत्येक दिवसाच्या प्रत्येक क्षणाकडुन जन्म दिवसाच्या अगणित शुभेच्छा” आपणास जन्मदिनाच्या मनपुर्वक लक्ष लक्ष हार्दिक शुभेच्छा.
आपणास कुलस्वामिनी तुळजा भवानी, आई जगदंबेच्या कृपेने प्रसन्न, निरोगी, उदंड आयुष्य, मान, सन्मान, बुद्धी, यशोकिर्तीमय जीवन देवो हीच सदिच्छा. 🙏🙏
प्रकाशकिरण….✍️
शुभेच्छूक :- डॉ.प्रकाश पांढरमिसे
रासेयो, विभागीय समन्वयक, इंदापूर
इतिहास विभाग प्रमुख,
श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालय बावडा, ता. इंदापूर, जि. पुणे
मो. नं. 9423639796
1 Comment
अप्रतिम लेखन. नवोदित शिक्षक, विद्यार्थी यांना प्रेरणादायी विचार. धन्यवाद