ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरीयल सोसायटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘इंजिनीरिंग टुडे-२०२३’ या १८व्या तांत्रिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १४ व १५ सप्टेंबर २०२३ , असे दोन दिवस आयोजित केलेल्या या उपक्रमात रासायनिक, स्थापत्य, संगणक , विद्युत , अणुविद्युत आणि दूरसंचार, ,यांत्रिक, उत्पादन, रोबोटिक्स आणि ऑटोमेशन, राष्ट्रीय सेवा योजना या विभागाच्या वॉर ऑफ टायट्रेन्टस , रेडियम क्रिकेट , शार्क टॅंक,
मॉडेल मेकिंग , बिल्डिंग बड्डी, क्विझ कॉम्पिटिशन , बॅटलफील्ड एरिना, लक्ष्यभेद व्हर्चुअल स्केप , लेसर वॉर, क्रिक ऑक्शन, चेम्बर ऑफ सेक्रेटस , एरो टास्क अँड डिजेमेनिया, रोबो सॉकर अँड रेस्टलिंग , हॅकॅथॉन, रोबो रेस, कॅड वॉर , एस्केप रूम, आयडियाथॉन, मॉक प्लेसमेंट, स्नॅप सीकर , सायटेक एक्सझिबिशन अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी बँक ऑफ बडोदा, आय टी एम बिजनेस स्कूल, आय एम एफ एस के. पी. सिंग एज्युकेशन सर्विसेस, आय बी एस बिझनेस स्कूल, कृषी कांचन सातारा, इम्पिरिअल ओव्हरसीस एज्युकेशनल कन्सल्टंट्स , अविष्कार ,सॉफ्कॉन ट्रेनिंग, एडवाईस ओव्हरसीस एज्युकेशनल कन्सल्टंट्स व टेक्निकल जसे दि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स (इंडिया),सोसायटी ऑफ ऑटॉमोटिव इंजिनियर्स इंडिया (एस ए ई इंडिया), इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन (आयएसटीई ), सोलार एनर्जी सोसायटी ऑफ इंडिया (एसइएसआय), बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया (बीएआय), इन्स्टिट्यूशन ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन इंजिनियर्स (आयईटीई), इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल इंजिनियर्स (IChE AISSMS COE), इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशन, इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन कौन्सिल (मिनिस्ट्री ऑफ एच आर डी इनिशियेटर), ट्रिझ असोसिएशन ऑफ एशिया यांचे प्रायोजकत्व लाभले आहे
इंजिनिअरिंग टुडे – २०२३ हे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या बौध्दीक आणि तांत्रिक कौशल्याला वाव देणारे उत्कृष्ट व्यासपीठ असून, विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी एस बोरमणे यांनी केले आहे. या उपक्रमाचे उद्घाटन दि. १४ सप्टेंबर रोजी होणार असून, या कार्यक्रमासाठी देशभरातून उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे, कार्यक्रमाचे समन्वयक श्री. नितीन मावळे यांनी सांगितले.आहे.
श्रीमंत छत्रपती श्री. मालोजीराजे (सचिव, आयएसएएसएम संस्था ), श्री. सुरेश शिंदे (सहसचिव, आयएसएएसएम संस्था ), श्री. अजय पाटील (खजिनदार,आयएसएएसएम संस्था ) व व्यवस्थापकीय समिती यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.