शरीरावर कोणतीही उपाय योजना करण्याआधी मनावर / मेंदूवर काही उपाय करण्याची गरज असते.
आपल्याला जे काही शरीर मिळालेले आहे ते तसेच आवडते का आपल्याला?
कोणाला वाटते आपण बुटकेच आहोत, बारीकच आहोत, नाक मोठं/छोटं, दात पुढे,ओठ जाड/ पातळ, रंग सावळा, केस ड्राय, त्वचा तेलकट/शुष्क…एक न अनेक प्रचंड तक्रारी स्वतःच्याच शरीरा बद्दल.
त्यामुळे तयार होणारी negative mentality, समोरच्या एखाद्या व्यक्तीला आदर्श मानून त्यांच्या सोबत स्वतः ला तोलत राहायचे. यातूनच आजार जास्त वाढत जातात.
आपला सर्वात मोठा दोष म्हणजे “स्वयंशिस्त (Self Discipline)” नसणे. कोणीतरी लागते motivate करणारे. पण आपण असा विचार का नाही करत की “मीच स्वतः ला motivate करून समोरच्याला सुद्धा inspire करेन”?
आपल्या शरीराचे mechanism खूप सुंदर आहे जर आपण वेळ काढून शरीराचे ऐकले / त्याला समजून घेतले.
उदाहरण द्यायचे झाले तर पाण्यात आपल्या बोटांची त्वचा सुरकुतते त्याचे साधे कारण म्हणजे पाण्यात असताना आपल्याला पकड मिळावी.
चालताना जेवढी ऊर्जा लागते त्यापेक्षा जास्त पळताना लागते. मग ती ऊर्जा कुठून येते? तर शरीराने emergency साठी त्याची साठवणूक केलेली असते.
पण आपण ती साठवलेली ऊर्जा वापरली जावी असे काही करतच नाही. फक्त चुकीचा आहार घेत राहून त्या साठवणुकीत भर टाकत राहतो. आणि तक्रार करतो की “वजन वाढत चाललंय”.
आपल्या वाढणाऱ्या वजनात, वाढणाऱ्या आजारांत, vit च्या कमतरतेत, केस गळती, अकाली पांढरे केस, शरीरावर येणारे डाग, पुरळ, फोड यांचा दोष आपलाच असतो.
एकतर कधी खुलेपणाने त्रास सांगायचं नाही, मान्य करायचा नाही. का तर लोक काय बोलतील,पैसे खर्च होतील etc. मग आजार वाढल्यावर ते पैसे dr ला देतील आणि स्वतः सोबत घरच्यांना त्रास.
पण हेच जर का काहीही न लपविता dr ला सांगितले आणि सांगितलेल्या गोष्टी न चुकता अंमलात आणल्या तर भलं कोणाचे होणारेय?
घरगुती उपाय करून रोग तात्पुरता बरा झाला असा भ्रम होऊ शकतो. पण नंतर बळावला तर त्याचा त्रास स्वतः भोगत रहावा. घरातील इतरांचा बळी देऊ नये त्यासाठी.
आपल्या पिढीकडे खूप सोयीसुविधा आहेत. बुद्धी आणि डोळे कान उघडे ठेवून आपले शरीर आणि आयुष्य सुंदर करता येते
फक्त “इच्छा” हवी.
सुजाता
(Certified Sports Nutritionist)