धी शेंदूर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटीव्ह सोसायटीचे अप्पासाहेब रघुनाथराव भाऊराव गरुड कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, शेंदूर्णी च्या वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखा आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज ब्रोकर्स फोरम, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने “कोरोना काळात भारताची आणि जगाची आर्थिक परिस्थिति आणि गुंतवणूक निर्णय” या विषयावरील स्वतंत्र अशी पाच दिवसीय (साप्ताहिक) कार्यशाळा दि. 21 ते 25 सप्टेंबर, 2020 याकाळात शिक्षक, उद्योजक, गुंतवणूकदार, व्यावसायिक, इ. करिता आयोजित करण्यात आली. याकरिता राज्यातील किंवा देशातीलच नव्हेतर विदेशातील 560 पेक्षा अधिक शिक्षकांनी सहभाग नोंदविला. या कार्यशाळेअंतर्गत शिक्षक, व्यावसायिक, गुंतवणूकदार, इ. करिता “शिक्षक विकास कार्यशाळा” हि कार्यशाळा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ब्रोकर्स फोरम मुंबई यांच्या “गुंतवणूकदार शिक्षण आणि जनजागृती” या उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आली होती.
बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ब्रोकर्स फोरम मुंबई यांच्या “गुंतवणूकदार शिक्षण आणि जनजागृती” या उपक्रमांतर्गत एक आठवड्याचा शिक्षक विकास कार्यक्रम (Faculty Development Programme) बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ब्रोकर्स फोरम च्या सहकार्याने महाविद्यालयात गूगल मीट या ऑनलाइन प्लॅटफॉर्म वर आभासी परिषदेच्या माध्यमातून दि. २१ ते २५ सप्टेंबर, २०२० याकालावधीत आयोजित करण्यात आली होती. याकार्यशाळेत आपल्या महाविद्यालयातील शिक्षकांसह, महाराष्ट्र किंवा भारतातीलच नव्हेतर भारताबाहेरून फिलिपिन्स, इराक, सलतन-ए-ओमान, नायजेरिया, पाकिस्तान, नेपाळ, इ. देशातून अशा एकूण ५६० पेक्षा अधिक प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, व्यावसायिक, उद्योजक, पत्रकार, इंजिनीअर, डॉक्टर, इत्यादींनी नोंदणी करून सहभाग नोंदविला आणि सक्रिय सहभाग घेऊन भारतीय आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर कोरोना महामारीचा झालेला परिणाम याचा व्यापक मार्गदर्शनाचा फायदा सहभागीदारांनी घेतला. या कार्यशाळेकरिता बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ब्रोकर्स फोरमचे मुख्य अर्थतज्ञ आणि मुख्य परिचालक अधिकारी डॉ. व्ही. आदित्य श्रीनिवास हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभले होते. त्यांनी आपल्या ह्या पाच दिवसाच्या कार्यशाळेत कोरोना महामारीच्या काळात देशाच्या आणि जगाच्या अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम, भारताची तथा जगाची ढासळणारी आर्थिकस्थिति, जगाच्या अर्थव्यवस्थेत भारतीय अर्थव्यवस्थेची भूमिका, स्थान, भारतीय आणि जागतिक बाजारपेठेची सद्यस्थिती, परिणाम, नुकसान, इ. घटक विषद करण्याच्या अनुषंगाने त्यांनी सद्यस्थितीतील भारताची अर्थव्यवस्था आणि पुढील दिशा, कोरोना महामामारीच्या काळात अडचणीत सापडलेली अर्थव्यवस्था, या आव्हानात्मक काळातिल गुंतवणूक, संपत्ति वृद्धीकरिता सर्वसमावेशक निधिचे वाटप, म्युचूअल फंड मधील गुंतवणूक आणि संपत्तीची निर्मिती, इ. प्रमुख विषय घेऊन डॉ. व्ही. आदित्य श्रीनिवास यांनी अतिशय उत्कृष्ट आणि सोप्यापध्दतीने साध्या आणि सोप्या भाषेत विश्लेषणकरून अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात, भारतीय भागबाजार, शेअर बाजारावर कोरोना महामारीचा झालेला परिणाम, थांबलेली व्यवसायचक्रे, थांबलेली अर्थव्यवस्था, अनेक व्यवसायांची दिवाळखोरी, होणारे नुकसान, प्रवासी मजुरांचे स्थलांतर, ढासळणारी अर्थव्यवस्था, खलवणारा आणि नकारात्मक जीडिपी, उद्योगांचे खाजगीकरण, शेअर बाजार, विविध शेअर आणि प्रतिभूतींची सद्यस्थिती, शेअर आणि म्युचुअल फंड मधी गुंतवणूक, पध्दतशीर गुंतवणूक आराखडा, सेंसेक्स-निफ्टिफिफ्टी मधील चढउतार, सद्यस्तितीतील गुंतवणूक निर्णय, अल्पकालीन दीर्घकालीन गुंतवणूक आणि त्यामध्यमातून संपत्ति निर्मितीचे पर्याय इ. आणि अशा अनेक महत्वपूर्ण विषयावर त्यांनी अनमोल असे मार्गदर्शन केले.
कार्यशाळेची फलनिष्पत्ती तपासण्यासाठी चाचण्या घेण्यात आल्यात आणि त्या चाचण्याच्या निकालावर आधारित प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
या कार्याशाळेकरिता बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ब्रोकर्स फोरमच्या गुंतवणूकदार शिक्षण विभागाच्या प्रमुख मिस. शेहनाझ शेख, त्यांचे सहकारी मी. सिद्दिकी, मी. मुजब्बिर शेख, इ. मोलाचे सहकार्य केले
तर आपल्या महाविद्यालयात ही कार्यशाळा आयोजित करण्याच्या अनुषंगाने धी शेंदूर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑप. सोसायटीचे चेअरमन मा. दादासाहेब संजायजी गरुड, कार्याध्यक्ष मा. सतीशराव काशीदसाहेब, सचिव मा. श्री. काकासाहेब सागरमलजी जैन, सहसचिव मा. श्री. भाऊसाहेब दिपकजी गरुड, महिला संचालक मा. सौ. उज्वलाताई काशीद, जेष्ठ संचालक मा. श्री. दादासाहेब यु. यु. पाटील, सर्व संस्था पदाधिकारी तसेच प्राचार्य डॉ. वासूदेव र. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्राचार्य आणि वाणिज्य विभागप्रमुख डॉ. श्याम जीवन साळुंखे यांच्या प्रमुख प्रयत्नाने आणि डॉ. सुजाता पाटील, डॉ. योगिता चौधरी, डॉ. रोहिदास गवारे आणि डॉ. वसंत पतंगे यांच्या अनमोल सहकार्याने तसेच उपप्रचार्य प्रा. आर. जी. पाटील, उपप्रचार्य डॉ. संजय भोळे यांच्या उपस्थितीत यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय आणि शिक्षकेतर कर्मचार्यांच्या सहकार्याने दोन्ही कार्यशाळा यशस्वी करण्यास मदत झाली.