आज अक्षय तृतीया, सन येतात-जातात पण या लॉकडाऊनच्या काळात मी माझ्या गावी असल्यामुळे आईच्या असणाऱ्या अधिक श्रद्धा भक्तीमुळे जरा जास्तीच शिस्तीमुळे सणासुदीची व्यवस्थित पालन होत होतं, आणि जेव्हा मी पुण्यामध्ये असतो तेव्हा तर आईचा आवर्जून आज एकादशी आहे सांगण्यासाठी फोन येतो, कारण इतकच की आज कुठल्या कारणांनी नॉनव्हेज खाऊन आपण शिकारी वंशाचे असल्याचे सिद्ध करण्याची गरज नाही….. असो, आज माझी पुतणी राजलक्ष्मी 21 दिवसांची झाली, त्या कारणे आमच्या सहकुटुंब रोजच्या सायंकाळच्या अंगणातल्या चर्चेमध्ये मी 21 दिवसाच्या असताना एक घडलेली घटना चर्चेत आली, आणि सहज अशा होणाऱ्या चर्चांमधून अचानक असा आयुष्याचा क्षण आठवून येतो आणि आयुष्याचं महत्त्व पुन्हा अधोरेखित होतं. सध्या परिस्थितीत वाटणारे संकटे अडचणी क्षण अर्धात विरून जाऊन लहान वाटायला लागतात……
एखादी गोष्ट सलग एकवीस दिवस केली तर म्हणे त्याची सवय लागते ,,,, कदाचित मलाही तसंच काहीतरी झालं, जन्मानंतर एकवीस दिवस जगलो आणि आता मला त्याची सवय झाली आहे ….
7 मार्च 1982 जन्मजात हर्निया घेऊन जन्माला आलेलो मी आमच्या एकत्र कुटुंबातील बारा तेराव मुल म्हणजे डझनभर पोरांच्या मधला एक त्यावेळच्या शेतकरी अशा 50 जणांच्या एकत्र कुटुंबा मधला एक सदस्य त्यामुळे कुटुंबकर्त्यांसाठी प्रायोरिटी नंबर 50 परंतु माझ्या आई वडीलांसाठी त्यांच्या लग्नानंतर झालेल मी म्हणजे त्यांचं पहिलं मुल त्यांच्यासाठी प्रायोरिटी नंबर एक…… एकञ कुटुंबाच्या राहाट गाड्यांमध्ये, आर्थिक विवंचनाच्या काळामध्ये, ट्रीटमेंट कुठे मिळते याची पूर्ण कल्पना नसलेल्या अज्ञानामध्ये, माझ्या आई-वडिलांचा झालेला भावनिक संघर्ष आज ते मला बोलून दाखवत होते.
जन्मानंतर सहाव्या सातव्या दिवशी डायग्नोसिस झाले की, मुलाला हर्निया (Inguinal hernias) आहे. Survival Is Not Possible…. तरीपण माझी पाचवी पुजलेली सटवाई हसली. आजोळी बाराव्या दिवशी बारसे केले. आजोबांनी नाव ठेवले रणजीत म्हणाले, प्रत्येक रणांगण जिंकेल, आणि दुसऱ्या दिवशी रणांगणात पाठवलं म्हणजे माझ्या वयाच्या तेराव्या दिवशी मला सातारच्या गीते बिल्डिंगमध्ये लवंगारे हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले. एकविसाव्या दिवशी माझे सहा ते सात तासाचे ऑपरेशन केले गेले, तिथून पुढे 45 दिवसाचे हॉस्पिटलचे रणांगण जगलो आणि आजही जगत आहे. आज 37 व्या वर्षी एलआयसी ची नवीन पॉलिसी घेताना मेडिकल एक्झामिनेशन मध्ये विचारले याआधी कधी ऑपरेशन झाले आहे का अभिमानाने सांगितले की एकविसाव्या दिवशी झाले आहे, आमचा प्रिय मित्र आणि एलआयसीचा डिओ जावेद मला फोन करून ओरडला म्हणाला ” रंज्या लेका कोण सांगतो का एकविसाव्या दिवशी ऑपरेशन झाले होते ते आणि लगा तू सामान बी काढून दावले इथं मला टाके घातले होते म्हणून कसा रं ….. वकील झालास तू…..
मला वाटते माझ्या आयुष्याचा तो पहिला लॉक डाऊन, आज विश्वावर आलेल्या संकटामुळे घरात बसून आहे (Stay Home Stay Safe) परंतु या विश्वामध्ये माझी Entry Confirm होत नव्हती तेव्हा 45 दिवसाचा लॉक डाऊन माझं Survival Is Not Possible ते रणजीत Is Here To Stay असा जिंकण्याचा पाया या आयुष्याने रचून दिला आहे. ज्या गीते बिल्डिंगमध्ये माझा ऑपरेशन झालं त्याच्याच आजुबाजूला बऱ्याचश्या बिल्डिंगची रिडेव्हलपमेंट आणि बिल्डिंग कन्स्ट्रक्शनची कामे पूर्ण करतो आहे. अगदी देश स्तरावर आपल्या कामाबद्दल नावाजलो गेलेलो आहे बक्षीस मिळालेली आहेत. हे शक्य झालं फक्त १३ व्या दिवशी उतरलेल्या रणांगणामुळेच….. कदाचित त्या गीते बिल्डिंगचे रिडेव्हलपमेंटचे काम माझ्याकडे येईल तसे झाले तर तो एक सुवर्णयोग असेल आणि तोही आनंदाने पूर्ण करेन.आजही 42.5 किलोमीटरची पूर्ण मॅरेथॉन धावतो, मित्रांच्या मैत्रीमध्ये बहरतो जमेल तिथे एकमेकांना मदतीचा हात देतो, आयुष्याने पहिल्या 21 दिवसात लावलेली सवय मनापासून उपभोगतो आहे म्हणजे मनापासून आयुष्य जगतोय,,,,
लॉकडाऊन बऱ्याच अंशी चिंतनाचा काळ झालेला आहे.चिंतेपासून ते चिंतनापर्यंत प्रवास करा. अशा छोट्या छोट्या गोष्टी ऐकल्यानंतर चर्चा केल्यानंतर भविष्याबद्दल असणारे हुरहुर घालवून आपल्याला नवीन उमेद येतीये, त्याच्यासाठी घरी राहा कुटुंबाबरोबर चर्चा करा छोटेसे हळवे क्षण अलगद टिपा आणि त्या टिपलेल्या क्षणांच्या दवबिंदुं वर आयुष्याच्या सोनेरी पहाटेची किरणे अलगद पकडा….
The author Advocate Ranjit mane is a successful business man. He completed his MBA from IIM calcutta and was a merit holder. He also owns a successful construction business.
for more such articles visit www.mahaedunews.com.
13 Comments
जिवनाशी संघर्ष करत असताना मिळालेली एक अद्भुत भेट ….जीवन म्हणजे नक्की काय असतं….😊
अप्रतिम लेख….. 👌
Good one Ranjya….your achievements, excellence was never an accident… We have seen it……it is the result of high Intention, sincere effort, intelligent direction, skillful execution and the vision to see the obstacles as opportunities…. all the best for your future endeavors…
Great Thoughts, Positive way to look at the things.
Well written.
Wish you a long and healthy life
Best wishes
सुंदर लेख अप्रतीम मांडणी जिवन संघर्षांत जिंकलेली कहाणी
संघर्ष करून कमावलेली health आणि wealth … गरजु्ंना वेळेवर हात देणारा आणि मित्रांसोबत रमणारा …. राजा माणूस….”रंज्या”…. fighter आहेस भावा…. “कर हर मैदान फतेह….” Best wishes 👍👍👍
Highly motivation. You keep growing in life.
खूप छान ,अगदी मनापासून लिहलेले कुठलेही आढेवेढे नाही ,कुठेही अतिशोक्ती नांही,आणि सर्व कुटुंबाबद्दल ची आपुलकी मनाला अलगद स्पर्श करून जाते ,,
Well written Ranjit. I can only imagine my dorm mate who has scaled the ladder of success through shear determination and the bond of trust you share with all your associates. Keep kicking high
खुप सुरेख मांडणी केली आहे, कुठेही नकारात्मकता नाही. जीवनातील प्रसंग मांडताना अतीशय सरळपणे मांडला आहे. आता लॉक डाऊन असताना आपण काय काय करु शकतो, तेही लोकांसमोर साधेपणाने मांडून एक प्रकारे न कळत लोकांना दिशादर्शन केले आहे पण त्यात कोठेही मोठेपणाचा लवलेशही दाखवला नाही. आवडले.
Nicely written by a nice person
Very well written Ranjya.. thoughtful and inspiring.. stay blessed Mitra.
Khup sunder article.Atishay aavadle.