आयुष्यात खूप काही घडत, आणि फक्त आपणच त्याची समीक्षा करू शकतो. नाही फार कुणाल सांगता येत, नाही त्याची फार चर्चा करता येत. अवघड वळणावर तर फक्त आपण एकटेच असतो. आपली बरीचशी ताकद स्वतःशी लढण्यात आणि समजवण्यात जाते. सतत एक प्रकराची झुंज आपण आपल्या आयुष्यात करत असतो. खूप कमी वयात बऱ्याच गोष्टींचा अनुभव आला की ही कदाचीत असं होत असावं. त्याला बरेच जण Early Maturity पण म्हणतात. कस वागणं चांगल हा एक वेगळा विषय होऊ शकतो. पण विचारी माणसाला त्रास होतो हे मात्र निश्चित. आयुष्य हे Normal असू शकत का हा प्रश्न मला सतत पढायचा. पण आता पर्यंत तर कधी जाणवलं नाही.
लहान असल्या पासून स्पर्धा. मोठे झालो तरी स्पर्धा. ह्या स्पर्धा कधी आपल्या आयुष्यातून जाणार आहेत कि नाही ह्याचा विचार सुद्धा करणे व्यर्थ झाले आहे. झोपेत सुद्धा आपण कोणत्या न कोणत्या तरी स्पर्धेची तयारी करत असतो. मनात मात्र सतत एक प्रश्न पढायचा, यश हे स्पर्धेच्या परीक्षेतच आहे का. स्पर्धेच्या परीक्षेचा उद्देश जरी बदलत गेला तरी आपली मानसिक स्थिती मात्र तीच राहाते.
चौथीपर्यंत मला कोणत्या ही स्पर्धेची माहिती न्हवती आणि ना ही मला ती जाणून घेण्याची इच्छा होती. पाचवीत मात्र चित्र बदललं आणि मनाच्या विरुद्ध सैनिक स्कूल Entrance Exam च्या परीक्षेची तयारी करावी लागली. का करतोय, कश्यासाठी करतोय, त्यांनी काय साध्य होणर आहे काही ही माहिती न्हवते. पण वडील म्हणले की, कसल्याही परिस्थितीत ही परीक्षा पास झालीच पाहिजे. त्या मध्ये तुझे उज्ज्वल भविष्य आहे. भविष्याचे मला माहीत न्हवते, पण वडिल लष्करात असल्यामुळे त्यांच्या रागाचा अनुभव मात्र होताच. माझे दुसरे मित्र तर ह्या परीक्षेची तयारी करत नव्हते. मी एकटाच ही तयारी करतोय कि काय असं जाणवू लागलं. त्यात सैनिक स्कूल ची एक वेगळीच प्रतिमा. भीती आई-वडीलांपासून दूर तिथेच राहून शिकण्याची जास्त होती. वडील घरी असले तरच तयारी, इतर वेळ आपल्याला पास व्हायचंच न्हवत. ह्या मानसिकतेतून तयारी जेम-तेम झाली. पास होण्याची फार अपॆक्षाही न्हवती आणि मुळातच मी ती कालांतराने विसरून ही गेलो होतो.
पण Written Exam पास झालो आणि सगळ चित्र बदललं. घरामध्ये आनंदोउत्सव साजरा होऊ लागला. वडिलांना पहिल्यांदाच मी दिलखुलास हसताना पाहिलं. त्यांच्या डोळ्यात अपेक्षाच मृगजाळ विणलेलं दिसू लागलं आणि मी न कळत स्पर्ध्येच्या माया जाळात अडकून गेलो.
स्पर्धेत आनंद असतो हे मला हळू हळू लक्ष्यात येऊ लागल. स्पर्धाच सर्वस्व असते आणि त्यातला आनंद उत्तमातला उत्तम असतो हे मला कळायला फार वेळ लागला नाही. मेडिकल पास होऊन मेरिट मध्ये नाव आल्यानंतर माझ्या विचारांची दिशा बदलणार होती हे मात्र निश्चित झालं होत. थोडक्यात मी बद्द्ललो होतो विचाराने आणि मानसिकतेने. जिंकण्याची जिद्ध निर्माण झाली होती. प्रत्येक वेळी आपण जिंकलोच पाहिजे हे मनात घर करून गेलं होत.
खेळ असो कि अभ्यास आपण जिंकलंच पाहिजे ह्या भावना मात्र कधी बळकट होत गेल्या हे लक्ष्यातच आलं नाही. ही स्थिती चांगली का वाईट हे लक्षात येण्यासाठी आयुष्याचा खूप वेळ जावा लागला. ही स्पर्धा मी मित्रांमध्ये पाहू लागलो. आपल्या टीम मध्ये असणाऱ्यांनी जिंकलच पाहिजे हा हट्ट इतरांवरती लादू लागलो.
नशिबाने सुद्धा साथ दिली. जिंकत गेलो, यश ही प्राप्त झाले, Medals ही भेटले. माझी चर्चा होऊ लागली, माझ्या विना स्पर्धा होत नव्हती ह्याचा अभिमान वाटू लागला. पण मन कधीच शांत झालं नाही. आयुष्यात फक्त स्पर्धाच महत्वाच्या असतात अस मला वाटू लागला. आणि दुर्दैव म्हणजे त्या वर्तुळातून बाहेर पडण्याचा मार्ग मला माहितीच न्हवता. माझी स्तिथी त्या वीर योद्धा अभिमन्यूसारखी होती ज्याला विरोधी सैन्याचा कणा भेदायला तर येत होता पण त्यातून बाहेर कसे पडावे हे माहिती न्हवते. मी सुद्धा ह्या स्पर्ध्येच्या युगात उढी तर घेतली होती पण बाहेर कसे आणि कधी पडायचे हे मला खूप उशिरा कळले.
ज्यांनी कधी कोणत्या स्पर्ध्येत भाग घेतला नाही किवां कधी कोणती स्पर्धा जिंकली नाही त्याच्याकडे मी कधी पाहिलंच नाही. ना त्याचा कधी अभ्यास करायचा प्रयत्न केला. स्पर्ध्येच्या ओघात आपण काय गमावलय आणि आपल्याला काय प्राप्त झालय हे कळायला फार वेळ लागला.
मित्रहो, स्पर्धा आयुष्यात आवश्यक असतात ह्यात तीळ मात्र शंका नाही. पण त्याचा ओघ आणि व्याप्ती समजून घेणं गरजेचं आहे. आपल्या आयुष्यात आपण असंख्य स्पर्ध्येत सहभागी होत असतो. प्रत्येक स्पर्ध्येला तेवढीच व्याप्ती आणि महत्व आहे. जिंकण्याच्या ओघात जगण्याचं वर्तुळ छोट होत नाही ना ह्याची काळजी घेणं सुद्धा तितकेच महत्वाचे आहे.
for more news visit www.mahaedunews.com
23 Comments
A good attempt at showong, competition is not everything . Or life has no meaning. Etc. Well written .
खूप छान लेख शिवाजी भाऊ.
स्पर्ध्येच्या ओघात जगताना मनाची मानसिकता काय असते याचे विस्तृत लेखन केले आहे.
Good one shivaji
Keep writing
Nicely written !!!
shivaji remaimber that what is “deu for us is flood for ants” there are always differnt perspective you got 95 medals in school lot many acclaimations you were role model for so many so your spirit of compitition sure must have inspired many so will yir this spirit of free thinking and persuit of happiness ll do all th best budddy
thank you
यश ला अपयशाची किनार असते ते म्हणजे स्पर्धा
Our Captain, Mighty Tiger, often coined as BORN TO RULE….
Was source of inspiration and motivation for us. Excellent in Sports and Academics won 95 medals and countless trophies .
I do remember his words for underperformer cadets better learn or get kick on your back to be, The Legend…
Nice Article, neatly penned down the intricacies of competitive Exams and it’s psychological impact on the personality building, and it’s direct relationship with you and Team…
Concluded nicely with Life and Living horizons anology
Thank u sir
Good article Shivba, you are a champ and will always remain one. We all school mates of so proud of your achievements
Truely said , competitiveness and competition are most important at present but Life and it’s charm more than it
सुंदर u will be always appreciated and better example of how to do it and importance of capitation in life
U always inspired to your students n built their confidence …u r good mentor… keep it up… very informative n knowledgeable to the competitive students…. nice article sir
प्रा शिवाजी भोसले सर खूप छान लेख लिहलाय
V good 💐💐💐👍👍👍
फार सुंदर पद्धतीने शब्दांची मांडणी केली आहे 👌
जगताना स्वतःला योग्य ध्येय हवे आणि त्या ध्येय प्राप्तीसाठी स्पर्धा हवी कारण ध्येया शिवाय आणि स्पर्धेशिवाय निश्चितच मनुष्य दिशाहीन होऊ शकतो त्यामुळे स्वतःच्या उन्नतीकरिता प्रत्येकाने स्वतःच स्वतःसोबत स्पर्धा करणे हे गरजेचे असते !
It is written in a well manner. Generally, winners develop a habit to perform well in each and every Field. Your optimistic attitude, hard work, and consistent effort results in success.
thank u sir
It is written in a well manner. Generally, winners develop a habit to perform well in each and every Field.
अतिशय सुंदर लेख. आजच्या स्पर्धेच्या जगात आपण टिकलेच पाहिजे
Good Article Bhosale Sir 😊
Keep Writing…📝
Good One Shivaji,
Competition is a good thing as it forces us to do our best. you had 95 gold medals……… gold medals aren’t really made of gold. They are made of sweat, determination and a hard to find alloy called guts. The important thing to note is, you have now moved from competition to helping and inspiring others so that others can also reach their fullest potential……… competition to collaboration.
Good article sir, this type of articles gives the vision to see up and downs in life and how to tackle obstacles in life.