आज असाच एक व्हाट्सअप स्टेटस बघताना एक चांगला स्टेटस मला दिसला.
“वाचन हे पेरण असतं तर लिहिणं म्हणजे उगवणं.”
‘उगवण्याची चिंता करत बसण्यापेक्षा पेरणीला सुरुवात करा एक दिवस तुमच्या शेतातलं धान्य उगवलेले धान्य लोक पेरण्यासाठी घेऊन जातील’ – आनंद वार्ता
किती अर्थपूर्ण आणि सुंदर वाक्य आहे बघा, आणि हे वाक्य वाचल्यावरती मला एक माझ्या प्रवासादरम्यान घडलेला किस्सा आठवला.
एकदा मी माझ्या ऑफिसच्या कर्मचाऱ्यांसोबत कंपनी कामानिमित्त पुण्यात गेलो होतो. त्यावेळी परत येताना आमचा ऐतिहासिक विषयांवर ती बराच बरीच चर्चा सुरू होती. आणि जवळपास दोन ते तीन तास आम्ही या विषयावर बोलत होतो. आमच्याबरोबर असलेला गाडीचा ड्रायव्हर हे शांतपणे ऐकत होता. पण गाडी जेव्हा साताऱ्याच्या पुढे आली तेव्हा त्याने मला विचारले की, साहेब मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का? मी म्हणालो का नाही, विचार विचार ना. तर त्याने मला एक प्रयत्न केला की, ‘शाहू महाराजांच्या ‘कोल्हापूरचे शाहू महाराज बरं का’ तर शाहू महाराजांच्या घसरगुंडी बद्दल तुमचं मत काय आहे? अचानक असा अनाहूत विचारलेल्या प्रश्नामुळे माझ्यापुढे इतिहासातील ‘शाहू महाराज’ उभे राहिले. तसे पाहिले तर शाहू महाराजांचे कार्य खूप मोठे होते. त्यांचे कार्य समाजप्रबोधनाचे, अस्पृश्य- अस्पृश्यता निर्मूलनाचे, तसेच राज्यकारभार करताना त्यांना आलेल्या कटू अनुभवांचे वर्णन केले. तसेच हे सर्व सांगताना जसे माझी छाती अभिमानाने भरून आली होती तशीच त्याची आली होती. मग मी त्याला हे सांगितले की, अशा थोर थोर माणसांचे शत्रू सुद्धा तितकेच होते. त्यांनी शाहू महाराजांना बदनाम करण्याची एकही संधी सोडली नाही. त्यामधील एक ही संधी की, त्यांच्या विरुद्ध रचलेले हे कुभांड की शंभर टक्के खोटे असून त्यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी केलेला एक डाव होता. जोमी खोडून काढून त्या मुलाच्या मनातील शंका दूर केली. पण हे कशामुळे झाले मी वाचलेल्या शाहूमहाराजांच्या मुळे आणि त्यांनी केलेल्या कार्यामुळे. सांगायचे कारण एवढेच की एखाद्या विषयावर चर्चा चालू असताना जर कोणी एखादा प्रश्न विचारला तर त्यावर उत्तर देण्यासाठी आपल्याकडे तितके पुरेसे ज्ञान आवश्यक हवे जर असेल तरच आपण या प्रश्नांना उत्तर देऊ शकतो. म्हणूनच म्हणतो मी की वाचन हे खूप महत्त्वाचे आहे.
स्टेटस लावायचा म्हणून भारी भारी व सुंदर अवघड वाक्य आपण स्टेटसला लावतो. पण कधी त्या वाक्यांच्या आत मध्ये घुसायचा प्रयत्न करतो का? विचारा स्वतःच्या मनाला..! आपण कधीच नाही करत. एखाद्याचे विचार करण्याची क्षमता त्याच्या बोलण्यावरून लक्षात येते. पण त्याला विचार करायला लावणारं जे टॉनिक आहे, ते त्याला त्याने वाचलेल्या पुस्तकांमधूनच मिळतं हे हि तितकच खरं आहे. आयुष्यावर गप्पा मारताना आपण जेव्हा चहा-कॉफी आणी फराळाला केलेल्या गोष्टीवर जेव्हा गप्पा मारतो, तेव्हाच आपण आपल्या मेंदूच्या शक्तीला निष्क्रिय करत असतो हेही लक्षात घ्यायला हवे. आणि त्यातून आनंद कमी पण चुका जास्त दिसतात किंवा एकमेकांच्या चुकीचे समर्थन. त्याला आपण असे म्हणू शकतो की ‘मनाने मेंदूशी केलेली प्रतारणा.’
वाचनाबाबत एक किस्सा सांगायचं झाल्यास, या माझ्या मित्राची मुलगी आजारी असल्यामुळे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती त्यावेळी me व माझा मित्र तिला बघाव्यात गेलो होतो. तिथे आम्हाला एक हिटलर वेडे फॅन भेटले व बाहेर आल्यावर असंच आम्ही हिटलर var चर्चा करायचे म्हणून, मी सहज म्हंटले की हिटलर खूप क्रूरकर्मा होता. पण आमच्या समोर असलेल्या sir यांनी आमचे म्हणणे पूर्णपणे खोडून काढण्याचा प्रयत्न केला व आम्ही त्याला विरोधी करू शकलो नाही. कारण हिटलर बद्दल त्यांचा अभ्यास इतका मोठा होता की हिटलरची युद्धनीती याच्यावर कित्येक जणांनी पुस्तक लिहिलेले आहेत. हे त्यांनी आम्हाला आवर्जून सांगितले. तसेच हिटलर नीती ही जगातील एक उत्कृष्ट युद्धनिती आहे, जी कमी वेळेमध्ये जास्त आक्रमक व युद्ध जिंकण्यासाठी उपयुक्त आहे. त्यांच्याबरोबर युक्तिवाद करताना मी तर शांत होतो पण माझा मित्र आयआयटी मुंबईचा विद्यार्थी असल्यामुळे त्याचे वाचन खूप जास्त होते. त्यानेही बऱ्याच गोष्टी काही पॉझिटिव असतील काही निगेटिव असतील हिटलर व्यक्तीच्या मला सांगितल्या. असेच कधी चर्चा करायचा वेळ आली वेळ आलीच तर आपल्याकडे किती ज्ञान पुंजी आहे याच्या वरती आपण किती वेळ चर्चमध्ये टिकू शकतो हे ठरतं. त्यामुळे वाचनाची आवड किती महत्वाची आहे आणि त्याने आपल्या ज्ञानात किती भर पडते आणि आपण किती समृद्ध होतो हेही तितकेच महत्त्वाचे आहे.
असाच एक म्हणजेच मजेशीर किस्सा माझ्या बाबतीत घडला होता. तो म्हणजे माझा एक मित्र गोविंद पानसरे यांनी लिहिलेल्या ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकावर टीका करत होता. कारण असे होते की छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी नावाने उल्लेख करणे. आता छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येक महाराष्ट्रीयन किंवा मराठी माणसाच्या मनात आदराने किती मोठे आहेत हे दुसरे कोणी सांगायची गरज नाही. पण बऱ्याचदा त्यांनी केलेले कार्य विसरून आपण त्यांच्या नावाचा वापर हा फक्त काही प्रकारच्या वैयक्तिक किंवा राजकीय स्वार्थासाठी करत असतो. जसे की ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकांमध्ये गोविंद पानसरे यांनी अगदी विस्तृतपणे त्या काळातली छत्रपती शिवाजी महाराजांची महसूल व्यवस्था, आर्थिक आणि सामाजिक आणि राजकीय आघाड्यांवर शिवाजी महाराजांचे राज्य कसे रयतेसाठी चांगले होते व यामुळेच रयतेच्या मनात शिवाजी महाराज स्वराजयाबद्दल आपुलकी व विश्वास निर्माण करू शकले. हे त्यांनी मांडले आहे व आत्ताचा राज्यकर्त्यांमध्ये तो विश्वास आणि जनतेमध्ये राज्यकर्त्यां बद्दलचा विश्वास यामध्ये मोठी तफावत आहे. यातील फरक मांडायचा त्यांनी प्रयत्न केला आहे. पण बऱ्याचदा आपण फक्त कोणीतरी सांगितले म्हणून विचार न करता कोणत्याही गोष्टीचा विरोध करतो पण विरोध करताना खरंच गोष्ट विरोधा योग्य आहे की नाही याचा कुणीही पडताळणी करून पाहत नाही. जी खरच गरजेचे असते आणि ती फक्त वाचनातूनच निर्माण होते. म्हणून वाचन हे खूप महत्त्वाचे असते.,कोणत्याही पटलावर किंवा क्षितिजावर मग ते सामाजिक असो राजकीय. किंवा अन्य कोणतेही क्षेत्र असो त्याच्यामध्ये जर आपला ठसा आपणास उठवायचा असेल तर तर आपल्याला वाचनाशिवाय पर्याय नाही. म्हणून जसं सुरुवातीच्या वाक्यांमध्ये सांगितला आहे वाचन म्हणजे प्रेरणा असते आणि लिहिणं म्हणजे उगवne याचा अर्थ असा आहे की, आपण वाचलं तरच लिहू शकतो म्हणजेच पेरलं तर उगाऊ शकते. म्हणूनच आपण अगोदर वाचायला शिकले पाहिजे कारण अर्थार्जन करण्याचे भरपूर मार्ग आहेत पण ज्ञानार्जन करण्यासाठी वाचन हा एकमेव मार्ग आहे.
जस उगवायचा अगोदर पेरणे महत्त्वाचं असतं, अगदी तसंच काय करायचं आणि कसं करायचं हे तितकंच महत्त्वाचं असतं. नकळत आपण आपल्या आयुष्यात, जगण्याच्या धडपडीत, आपण जगण्याची दिशाच हरवून बसतो. पण यातून बाहेर पडण्यासाठी किंवा स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी किंवा आयुष्यातील आपल्या कोणत्याही कठीण क्षणाला हरवण्यासाठी किंवा त्याच्याशी लढण्यासाठी लढण्यासाठी उपयोगाला येतं ते म्हणजे आपल्या ‘ज्ञान.’ आणि ते वाचनातूनच मिळतं, त्यामुळे मित्रांनो वाचनाकडे सकारात्मक बघा व हेल्दी चर्चेमध्ये स्वतःला इन्व्हाईट करा यातून वाईट काही नाही पण चांगलंच होईल आणि चांगलं वागायला शिकाल ज्याचा परिणाम दुसऱ्यांवर तुमचा प्रभाव पडताना दिसेल. व तुमची एक वेगळी ओळख निर्माण करण्यास मदत होईल. त्यामुळे वाचन हे किती महत्त्वाचे आहे आहे हे समजून, आपण ठरवून अगदी मुद्दाम ठरवून आपल्या या दररोजच्या वेळे मधून थोडासा वेळ हा वाचण्यासाठी दिला पाहिजे.
पण या आजच्या पिढीकडे जर नजर उचलून पाहिले तर या वाक्याचा संदर्भ क्वचितच लागतो. वाचनावरची निष्ठा, प्रेम इतकं कमी झालंय की मग कारणे कोणतीही असोत, कुणी व्यवसाया निमीत्त, कुणी नोकरीनिमित्त, कुणी उद्योगांमध्ये इतका स्वतःला व्यस्त करून घेतले आहे की की पैशाच्या मागे धावताना आपण आपल्या आयुष्याचे जगण्याचे गमक विसरून गेलो आहोत. पैसा हे एक आयुष्यातील माध्यम आहे. हे ते जगण्यासाठी गरजेचे आहे पण कितपत, हे मात्र आपणा कोणालाच माहीत नाही. ‘आपल्याला जगण्यासाठी लागणार इतपतच असाव कदाचित’ आणि आपल्याला जगण्यासाठी लागतं किती याचा प्रत्यय आपल्याला lockdown मध्ये चांगलाच आला आहे.
आता या उपरोक्त बोलायचं झाले तर वरील वाक्य किती सुंदर आहे. ‘वाचन म्हणजे पेरणे’ पण मला सांगा मित्रांनो विषय समजणारी माणसं आणि विषयातील गोडी समजून घेणारी आणि त्याची आसक्ती असणारी माणसं किती शिल्लक आहेत,? कित्येक जणांनी व्हाट्सअप सारख्या सोशल मीडियावर ग्रुप तयार केले आहेत, पण त्या ग्रुपमध्ये किती हेल्थी डिस्कशन होतात किंवा किती वाचण्यायोग्य E बुक शेअर केली जातात, अगदी एक टक्के सुद्धा नाही. असे का? कारण आपल्या लाईफ मध्ये आपण इतके गुरफटून गेलो आहे की स्टेटस मध्ये जगण्याच्या आणि स्टेटस मध्ये राहण्याच्या नादात आपण आपली वाचन शक्ती गमावून बसलोय आणि टीआरपी वर चालणाऱ्या मालिका पाहण्यात आणि तसेच मालिकेत दाखवल्याप्रमाणे वागण्यात आपल्या आयुष्यातील इतका वेळ खर्च करतोय की, आपल्याला आपण घालवलेल्या वेळेचे भान राहिले नाही. आपण मरेपर्यंत इतका वेळ घालवतो की त्याचं आपल्याला सोयरसुतक नसते. कारण आपला विषय एकच असतो की इतरांच्या तुलनेत आपण कसे जगतो. कित्येकांना असे वाटते की, पुस्तके वाचून आपल्याला करायचे काय आहे. थोडीच आपले डेली रुटीन बदलणार आहे. पण मित्रांनो एक सांगू ‘पुस्तकां सारखा चांगला दुसरा कोणताच मित्र असू शकत नाही’ असा आपल्याला अनेकांनी सांगितला आहे. आपली ज्ञानसंपदा वाढवण्यासाठी तसेच जीवनाचा दृष्टिकोन समजून सांगायला पुस्तकांसारखा मित्र म्हना किंवा गुरु म्हना, दुसरा कोणीही नाही. हेही तितकंच खरं आहे. गप्पा मारताना आपला अशा विषयात रस असतो ज्या विषयांचा आपल्या आयुष्यात काडीमात्र संबंध नाही किंवा उपयोग नाही. मी ठामपणे सांगू शकतो की सध्या दोन किंवा त्यापेक्षा जास्त लोक एकत्र आले, गप्पा मारण्यासाठी, तरीही 90% पेक्षा जास्त लोक हे एकमेकांची मापं काढण्यात वेळ घालवतात. दुसर्याच्या चुका शोधण्यात आपल्याला आनंद मिळतो व समाधानही मिळाल्याचे भास होतात. ही आपल्या आनंदाची आणि समाधानाची व्याख्या नसावी एवढीच काय ती माफक अपेक्षा.
धन्यवाद
for more such news and articlesvisit www.mahaedunews.com. you can send your articles to mahaedunews@gmail.com
21 Comments
Nice Article Pravin…👌
Keep Writing…..📝
Thank You.
Nice Article .
Thank You Prashant.
Nice article.Everyone should be read it.
Thank You.
छान 👌👌पहिल्या प्रयत्नातच इतकं चांगलं लेखन….👌👌
Thank You Prakash.
Awesome Article..👍👍
Good one sir
Keep it up
Thank You Sir.
Good…. Indeed
As a beginner its awesome
Thank You Kiran.
प्रवीण अतिशय उत्तम लिहले आहे. वाचताना आपण बोलतो आहे असा भास होत होता, याचाच अर्थ तुमचे लिखाण छान आहे. खूप खूप शुभेच्छा 💐💐💐
खूप खूप धन्यवाद इनामदार सर
Excellent Mr. Pravin Pawar.
Keep it up!
Thank You Yogesh.
Nice
Thank You Swati.
Nice Article
Thank You Sachin