कोरोना हा शब्द आज सर्व जगामध्ये बोलू आणि ऐकू येणारा असा एकमेव शब्द. तो एकेदिवशी सापडतो काय आणि सर्व जगात मूत्यूचे तांडव निर्माण करतोय काय सगळे कल्पना पलीकडे. कोविद-१९ हा एक सूक्ष्म विषाणू आहे. जो मानवाच्या अस्तित्वाला, संपूर्ण नष्ट करण्याच्या मार्गात आहे. पण मानव असा प्राणी आहे की तो त्यालाही एक दिवस संपूर्ण नष्ट केल्याशिवाय राहणार नाही.
आज प्रत्येक जण त्याचे अस्तित्व कबूल करत आहे. एरवी मुक्त, स्वछंदी, काहीही करण्यास उत्सुक, नवनवीन आव्हाने स्वीकारणार व मंगळ ग्रहाला गवासणी घालणारा, ताशी हजारो किलोमीटर धावणारा, अनेक नवनवीन शोध लावणारा हा माणूस आज घरात कोंडला गेला आहे अगदी काही न बोलता, शांत बसलाय ते पण एका छोट्या सूक्ष्म जीवामुळे.
अचानक एके दिवशी असे होते की या अत्याधुनिक माणसाची रोजची धावाधाव थांबते. आनंदाने जगणे बंद होते. छोट्याशा जागेत राहावे लागते. मिळेल ते खायचे,घरूनच काम करायचे, कधीच न थांबणारा,घरात न बसणारा हा मानव आज घरातील कामे निमूटपणे करू लागला आहे.घरच्यांशी बोलू लागला आहे. इतरांशी प्रेमाने संवाद साधत आहे, जो संवाद कुठे तरी थांबला होता पुन्हा काम सुरू होणार का? पगार चालू राहणार का? या लाँकडाऊन मधून बाहेर पडल्यावर मी पुन्हा पहिल्या सारखा धावेन असे अनेक विचार तो आता करू लागला.
लाँकडाऊनमुळे शाळा बंद झाल्या. किलबिल करणारी ही पाखरे एकदम घरट्यात कोंडली गेलीत कोरोनाच्या भीतीने. काय वाटत असेल या जीवाला घरात बसल्यावर. अनाकलनीय आहे या सर्व गोष्टी त्यांच्यासाठी. शाळा बंद झाली उघडणार की नाही माहिती नाही. घराच्या बाहेर जायचे नाही. बाहेरचे जग खिडकीतून न्याहळत, मजेत नाचणारी ही शाळेतील मुले एकदम गप्प झाली या कोरोनाने. आमच्या काळात अनेक सुख दुःख, अडीअडचणी पाहिल्या. या काळातील परिस्थिती आमच्या ही आवक्या बाहेरची आहे. पण थोडफार सांभाळू शकतो. पण या चिमुकल्यांनी जीवनाचे काहीच चढ-उतार पाहिले नाही. एवढे दिवस घरात बसायचे कसे यांनी? काय करायचे दिवसभर घरात बसून? असे कधी केले पण नाही ना. शाळा, घर आणि रंगीबेरंगी जग पाहताना दिवस कसे गेले या चिमुकल्यांना कसे सांगता येणार. आठवडयाची सुट्टी १-२ दिवस होती. दिवाळी, नाताळ, उन्हाळयाची सुट्टी, इतरही सुटया आणि आता तर न संपणारी सुट्टी असे समजत असतील ही मुले. बाहेर जाऊन काम करणारे आई ,बाबा, दादा आणि ताई आज घरी बसून काम करत आहे. सर्वाचा छान वेळ जातो दिवसभर. पण असे किती दिवस काढायचे असे सर्वच जणांना वाटते.
अचानक शाळा सांगते, मुलांनो काळजी करु नका शाळा जरी बंद असली तरी आँनलाईन शिक्षण चालू राहणार—–. हे शिक्षण काय असते सगळयांना माहीत आहे. पण हाच जीवनाचा भाग एवढया लवकर होणार हे अपेक्षित नव्हते मुलांना आणि शिक्षकांनाही. शिक्षक काही प्रमाणात याचा सराव करत होते. पण अचानक असे शिक्षण दयावे आणि घ्यावे लागणार या आदेशाने तारांबळ उडाली सर्वाची. कोणाच्या मोबाईलचा डेटा संपला. कोणाचे रिचार्ज नाही, आवाज नीट येत नाही, पाठाची तयारी, आपण आपल्या घरी मुले त्यांच्या घरी आणि आपण सगळयांनी वर्गात बसल्यासारखे शिकवायचे, वर्ग नियंत्रण संपले, मुलांनो शांत बसा, समजले का,परत एकदा सांगू का? कोणीतरी काही तरी विचारणार असे दिसू लागले. कोणाचे नाव घेऊन विचारले तर गोंधळ उडतो.आई-बाबांचे फोनचे स्क्रीन बंद पडले, लाँक उघडा, कनेक्टिव्हिटी गेली, आवाज कमी ऐकू येतो, शिक्षक पाठ पुढे नेतात, परत जाँईन करायचे, पासवर्ड वगैरे आता सरावाने जमायला लागले आहे बघा विद्यार्थी आणि शिक्षकांना ही.सुरवातीला शिक्षक आणि विद्यार्थ्यांना समस्या निर्माण झाली. पण सगळयांनी एकमेकांना सांभाळून घेत आता या आँनलाईन शिक्षणात मन रमू लागली. सर्व मुले आणि शिक्षक आता कनेक्ट झाली आहे. कधी न ऐकलेले नवीन शब्द, कठीण शब्द आता अर्थासहित पाठ झालीत, परीक्षेत “माझे लाँकडाऊन मधील दिवस आणि रात्र” असा निंबध जरी मुलांना लिहिण्यास सांगितला तरी खूप काही लिहू शकतील. कधी संपले हा लाँकडाऊन?
हा लाँकडाऊन आपण कधी पाहिला नाही तर या मुलांच्या मनात काय विचार येत असतील या परिस्तिथीबद्दल याचे अवलोकन करणे आवश्यक आहे.आता मुलांचे ई.लनिंग सुरू झाले आहे. भविष्यातही चालू राहील. या परिस्थितीत मुलांना पालकांचा मोबाईल दिला जातो का? किती वेळ दयायचा, माझे मँसेजेस,येणारे काँल, महत्त्वाची कामे, त्याचा पासवर्ड मुलांना देणार का? त्यांच्या जवळ बसून त्यांना मदत करणार का त्यांना अभ्यास संपण्याची वाट बघणार सर्वच सर्व काळ एकत्र. त्यामुळे चिडचिड, भांडण, तिरस्कार, ओढाताण, हेवेदावे हे असणारच.पण एकमेकांना समजून घेऊन त्यांना कसे प्रेमाने या काळात सांभाळायचे हे कुशल नेतृत्वाने करून घ्यावे. मुलांनाही आँनलाईन शिक्षण पद्धतीत अडचणी येत असतील, त्यांच्या बरोबर आपण आपले ज्ञान अपडेट करायला काय हरकत आहे. त्यामुळे मुलांच्या मनावरचा बराच ताण कमी होईल.
शिक्षकांनीही लाँकडाऊन नंतर मुलांशी वागताना या कालावधीत मुलांवर झालेले मानसिक ताणतणाव, याबद्दल लक्षात घ्यायला हवे. मुलांची या काळात निर्माण झालेली मानसिक परिस्थिती, त्याचा जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन, शाळेत आल्यावर काय करणे अपेक्षित आहे. खेळाचे तास,सामूहिक प्रार्थना, यांचे नियोजन कसे करावे?वर्गात किती मुले असतील? किती लांब त्यांना बसवायचे, वर्ग कमी पडतील काय,स्यानीटायझर ठेवावे लागतील,मधल्या सुट्टीत किती वेगात पळायचे, बसमध्ये कसे यावे, हसायचे आणि ओराडयाचे की नाही,मुलांनी किती लांबून वर्गात बोलायचे, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुलांची गतिशीलता कमी होईल, प्रत्येक गोष्टीला स्पर्श करण्यास घाबरतील,त्यांना आत्मविश्वासात घेऊन या सर्व गोष्टी प्रथम शिकव्याया लागतील.पहिल्या दिवशी लगेच अभ्यासक्रम शिकवला,भडीमार करून चालणार नाही व करू नये. मुलांना सेटल करावे .
शिक्षकांना मुले शाळेत येण्यापूर्वी त्यांची मानसिक स्थिती समजून घेणे गरजेचे आहे. अभ्यासक्रम शिकवताना शिक्षकांना येणाऱ्या अडचणी मुख्याध्यापकांनी लक्षात घ्याव्यात. पाठयक्रम कसा पूर्ण करायचा हे आजकालचे शैक्षणिक आव्हान आहे सर्वासाठी. जे बदल विद्यार्थ्यांकडून अपेक्षित आहेत ते आधी शिक्षकांनी आत्मसात करायला हवेत. शाळा निर्जतुक, स्वच्छ असावी. सर्व शाळेतील मावशी आणि काका यांना प्रशिक्षण दयावे लागले. सर्वाना मास्क घालणे, हँडवाँश करणे अनिवार्य असेल. जर कोणी मास्क आणायला विसरला असेल तर त्याला ते नवीन देता आले पाहिजे. हस्तांदोलन टाळले पाहिजे. शक्यतो हँडग्लोव्हस असावेत. सर्व शालेय कर्मचाऱ्यांनी शाळेच्या वेळात मुलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. सर्दी, खोकला, ताप असेल तर संबंधितांना संपर्क करता आला पाहिजे. इमर्जन्सी मध्ये लगेच निर्णय सर्व स्टाफला घेता आले पाहिजे. नजीकचे दवाखाने, डॉकटर,रुग्णवाहिका, पोलिस स्टेशन याचे ज्ञान हवे. सर्व विद्यार्थी आणि पालकांचे संपर्क क्रमांक असावेत सर्व शिक्षकांकडे. आँफिसमध्ये अद्यावत सर्व शाळेत शिक्षक, आणि विद्यार्थी यांची यादी असावी, संपर्क क्रमांकसहित, आपत्ती व्यवस्थापन काय असते हे आता पर्यंत सर्व शिक्षकांनी शिकवले असेल, अनुभवले असेल आता ते प्रत्यक्षात करण्याची वेळ आली आहे.
आता परिस्थिती पूर्णपणे बदलेली आहे. याचा स्वीकार आपण सगळयांनी केला पाहिजे.
for more such news visit www. mahaedunews.com
share your views by mailing us at mahaedunews@gmail.com