आयुष्यात थोडा वेडापणाही असायला हवा……
माणूस पैशाच्या मागे एवढे लागले आहे की, स्वतःचा आनंद कशामध्ये आहे हे विसरून गेलेय. सध्या करोना आजारामुळे सगळेच घरी बसले आहेत, पण जे घर आपण बनवण्यासाठी आयुष्यभर धडपडतो आता त्याच घरांमध्ये आपल्याला गुदमरल्यासारखे होत आहे. म्हणजे यावरून असे सिद्ध होतं की आपण आपल्या आयुष्यामध्ये किती ताणतणावाचं जीवन जगतो, सतत काम आणि टेन्शन घेण्याची सवय आपल्याला पडलेली आहे. म्हणूनच मी मनीषा चौधरी आज पुन्हा तुमच्यासमोर माझं मत मांडत आहे की, आयुष्यात थोडा वेडापणाही असणे आवश्यक आहे. घरामध्ये आनंदाचे वातावरण असले तर दिवस खूप सुखाचा आणि आनंदाने जातो. आपण कामांमध्ये आपला आनंद शोधला पाहिजे आणि प्रत्येकाच्या आयुष्यात कोणीतरी आनंद पसरवणारे असतात. जस माझ्या आयुष्यातही आहे माझे आई-वडील आणि एका व्यक्तीमुळे माझा बदलला त्यांना माझी बहीण मानते, माज्या मॅडम आहेत पण जेव्हापासून मि त्यांच्या सानिध्यात आली तेव्हापासून माझे आयुष्यच बदलून गेल. माझ्या योगिताताई……… त्यांचे उदाहरण द्यावंसं वाटतं त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे आणि त्यांचा छोटा मुलगा तीन वर्षाचा आहे योगिताताई सकाळी आठ वाजेला तीन वर्षाच्या मुलांना घरी सोडून दिवसभर बाहेर असतात आणि दिवसभरात स्वतःला खूप आनंदात ठेवून काम करत असतात आणि संध्याकाळी साडेपाच वाजता घरी आल्यावर त्यांचा पूर्ण वेळ आपल्या मुलांना देतात म्हणजे दिवसभर काम करून घरी आल्यावर घरचे काम करून मुलांना सांभाळतात आणि त्यांचा थकवा कुठेच निघून जातो. मला असं म्हणायचं आहे की, आपण दिवस आनंदात काम केलं तर त्याचा ताण आपल्याला जाणवत नाही आणि ते काम व्यवस्थित रित्या पार पाडता येतात.
आणी याचा अभ्यास वैज्ञानिकांनी केला आहे. त्यांनी असं सिद्ध केला आहे की जर आपण दिवसभर आनंदात राहिले तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा रोग किव्हा शारीरिक त्रास होत नाही. आयुष्याची पाच नियम आहे पहिला म्हणजे दुसऱ्या सोबत तुलना करू नये. दुसरा जास्त विचार करू नये. तिसरा भूतकाळातील नको त्या गोष्टी विसरून जा. चौथा दुसऱ्या तुमच्याबद्दल काय विचार करता तुम्ही विसरुन जा. आणि शेवटचे म्हणजे स्वतः आनंदी राहा…..
आज सहजच असा आठवलं की लोक किती टेन्शनमध्ये वावरत असतात म्हणून आज लिहिण्याचा प्रयत्न केला आणि हे लिहिण्याची आवड गिरीष सरांमुळे मिळाली धन्यवाद सर…. आणि लिहिण्यामध्ये काही चुकी झाली असेल तर क्षमा असावी…
अशी कोणतीही गोष्टी अवघड नसते
फक्त विचार पॉझिटिव पाहिजेत… !!
Manisha Choudhary (T.Y.B.Com)
Students can send their articles at mahaedunews@gmail.com
4 Comments
Nice Manishya Tray to unik Vye
Good ,khup Chan ,vichar avdle
Anandacha ek vachan
Manisha, khup mhatvachya goshti ahet dilelya ya lekhat. Good try!