सप्टेंबर ९९:
‘देवेंद्र, हा तुझा शेवटचा चान्स बर का…आता यापुढ़े आपल्याकड़े वेळही नाही आणि पैसेही…’ रात्री १० वाजता बॅग भरताभरता आईने स्पष्ट केले. कोपरगावाहून रात्री ११ची ट्रेन पकडून SSB साठी दिल्ली मार्गे देहरादून गाठायचे होते. SSB-म्हणजेच सिव्हर्सेस सिलेक्शन बोर्ड . सैन्यदलात अिधकारी होण्यासाठी देशपातळीवर अनेक परीक्षा पास व्हाव्या लागतात, त्यातील एक. सवर्प्रथम UPSC ची लेखी परीक्षा; त्यात पास झालं तर ५ दिवसांचे SSB इंटरव्ह्य; ते झालं तर ४-५ दिवसांच्या खडतर मेडीकल चाचण्या. इतकं सर्व झाल्यावर All India Merit List मधे चांगल्या नंबरवर याव लागतं. तेव्हा कुठे पुण्यातील NDA म्हणजेच National Defence Academy मध्ये प्रवेश मिळतो. खर तर सैिनक स्कूल साताऱ्यात राहुन ७ वर्षात जो नावलौिकक मिळिवला होता, त्याच्या ज़ोरावर आपलं NDA मध्ये सिलेक्शन सहज होणार हा आत्मिवश्वास… आत्मिवश्वासापेक्षा खर तर अहंकार कधीच मनात तयार होऊन बसला होता . विविध स्टेज ऍक्टिव्हिटीज मध्ये ट्रॉफीज ; स्पोट्र्स मध्ये मेडल्सची रांग; पब्लिक स्पीिकंग मध्ये अनेक सर्टिफिकेट्स ; १२वीत स्कूल व्हाईस कॅप्टनचे पद ई. सर्व माझ्या गोष्टींनी माझ्या immature मनात स्वतःबद्दलच्या अहंकाराचा एक भलामोठा डोंगरच तयार केला होता. त्यातल्या त्यात १२ वीतच पहिल्याच प्रयत्नात UPSC सहज पास झाल्याने मी जणू काही आकाशातच पोहोचलो होतो. पण १२वी सुटल्यावर SSB च्या पिहल्याच प्रयत्नात ‘Not Recommended’ होऊन धाडधिशी तोंडावर आपटलो, अहकंराचा बुड़बुड़ा फुटला आणि मी जमीनीवर परतलो. डिप्रेशनशी व टोमण्यांशी लढत पुन्हा एकदा कशीबशी UPSC दिली. १२वीत संपूर्ण लक्ष UPSC वर असल्याने बोर्डच्या पिरक्षेतही मार्क्स तसे जेमतेमच होते. पण वडिलांच्या प्रयत्नांमुळे जवळच्या इंजनीयरिंग कॉलेजात कसेबसे ऍडिमशन मिळाले व हवाई दलात लढ़ाऊ वैमानिक होऊन देशसेवा करण्याच्या स्वप्नाचा चुराडा पाठीवर लादून इंजनीयरिंग चे दिवस मी कसेबसे काढू लागलो. काही दिवसांनी अचानक बातमी मिळाली की मी पुन्हा एकदा UPSC पास झालोय आणि एयरफोर्स सिलेक्शन साठी मला पुन्हा एकदा बोलावण्यात आलय.
काळया ढगांभोवतालची चंदेरी किनार त्या दिवशी मी बघीतली , आणि चटदिशी तयारीला लागलो. तयारी म्हणलं तर काय; ना कसलं पुस्तक, ना कसले क्लासेस….फक्त पॉिझटीव्ह attitude व स्वतःवर दृढ़ आत्मविश्वास ..असंख्य अड़चणींवर मात करून, घरापासून इतक्या दूर सैनिक स्कूल मधे नाव कमावले, म्हणजे इतरांपेक्षा आपण अजिबात कमी नाही हा आत्मिवश्वास; आपल्याकड़े हारण्यासारख़ काहीच नाहीये, नाहीच काही झाल तर ‘इंजनीयरिंग है ना भाई’ या वस्तुिस्थतीच्या जाणीवेचा आत्मिवश्वास…या वेळेस तर भय व टेन्शन कुठच्याकुठे पळून गेल होतं. मागच्यासारखी overconfidence ची घोडचूक या वेळेस मात्र होऊ द्यायची नाही, हे
ध्येय मनाशी बांधून कोपरगावाहून रात्रीची ट्रेन पकडली व शांत झोपी गेलो. कधी दिल्ली गेल आणि कधी देहरादून आलं समजलच नाही. ठरिवल्याप्रमाणे, अगदी
मोकळया मनाने, बिनधास्त होऊन, दैवावर व स्वतःवर विश्वास ठेऊन interviews दिले. पुर्ण ५ दिवस वेगवेगळया चाचण्यांचे, वैयिक्तक व सामुिहक परीक्षांचे सत्र चालू होते. अजिबात विश्रांती नाही…मीही न घाबरता तयारच, केव्हाही, कुठेही. आमचे in-charge बलवंत साब नावाचे आर्मी चे भलेमोठे धिप्पाड सरदारजी होते. ते तर एकदा मला म्हणालेच-‘ओये पुत्तर, बाकी candidates तो रात-रात भर पढ़ते रैंदे हैं। तू तो वड्डा मस्त है…overconfidece हैं या
सिलेक्ट होना ही नी चहिदा ?’ मी म्हणालो-‘साब, SSB मे सिलेक्ट हो जाऊ ये तो मेरा सालो का सपना है लेिकन ईस बार अपने आप से १ डील की हैं। जब हारने के लिये कुछ हैं नही तो डरने के लिये क्या हैं। ….कोई शक?’.
निकालाचा दिवस उजाड़ला. १० वाजता निकालाची वेळ होती. SSB सेंटर तर्फे बाहरे बस तयार उभी होती…सर्वानी आधी आपापल्या बॅगा पॅक करुन बस मधे ठेऊन, मग result रूम मधे येणे अशी सूचना होती. इथ सिलेकशन पॅनलची लोकं result पुकारणार. त्यानंतर ज्यांच सिलेक्शन झाल नाही त्यांनी सरळ बस मधे बसायचं अन रेल्वे स्टेशन गाठायचं. तसं तर मी ट्रेनच टाइम टेबल रात्रीच पाहून ठेवल होतं. फक्त एकच टेंशन होतं; ट्रेन निकालानंतर तासाभरात होती…सुट्ली तर पुढ़ची सरळ रात्री ९ वाजता. तस बलवंतसाब ना ही सांगून ठेवल होत की जर निकालास उशीर असला तर मला लवकर जाण्यास परवानगी देण्यात यावी. ‘तू पास हो गया ना, तो बेटा तू तो गया’- बलवंत साब ची ताकीद.
सर्वांना Result रूम मधे बसवल गेल ….१-१ करत रिझल्ट announce व्हायला सुरूवात झाली…प्रत्येक नावानंतर एकच सीन…ज्याच नाव घेतलं त्याने दोन्ही हातानी चेहरा झाकून आनन्दाश्रू लपविण्याचा प्रयत्न करायचा, व आजुबाजुच्यांनी त्याला congratulate करायच. मिस युनिव्हर्स वाले ही लाजले असते. माझं मात्र पूर्ण लक्ष घड्याळाकड़े व बलवंत साब कड़े…जेव्हा पाठीमागच्याने धप्पिदशी पाठीत धाप देऊन मिठी मारली तेव्हा कुठे भानावर आलो. माझंही नाव announce झालं होतं. २२५ जणांपैकी आम्हा ५ जण सिलेक्ट झालो होतो…टाळयांच्या गड़गड़ाटात आणि असंख्य मीटठयां मध्ये मी स्तब्ध होतो.. इतक़या वषार्ची मेहनत, शेकडो स्वप्नांचे ओझे, मागील कित्येक महिने अनेकांच टिंगल टवाळयांचे टोमने…. काही क्षणांत सर्व आयुष्य बदललं.. कष्टांच चीज झाल…मनात फिरून – फिरून एकच विचार – ‘IS THIS A REALITY OR A BEAUTIFUL DREAM?’…
Emotions च्या त्या मिश्रणात ना काही समजत होते, ना काही ऐकु येत होते. जणु काही मी बहिरा झालो होतो. अचानक बलवंत साब गरजले आणि मी भानावर आलो ‘आप ५ लोग, दौड़के जाएंगे , बस में से अपनाअपना समान निकालेंगे, और दौड़के वािपस यही रिपोर्ट करेंगे… उसके बाद बाकी candidates बस में बैठ कर स्टेशन की ओर मार्च करेंगे. और तू हीरो, तू अलग से मेरे से मिलेगा…..कोई शक?’
for more such motivational news logon to www.mahaedunews.com
21 Comments
Mind blowing article . Happy to see how our school types handle even most trying and difficult situations
Thank you
Great sir 👍we proud of you always 💐
Inspirational, great 👍🏻
Thank you
Thank you
Very nice article
Thank you
Good Article…. Proud Of You 😊
Thank you
Simply Great
Thank you
Truly inspiring and motivational
Thank you
Really Awesome article
Proud of you Devendra for your never to die attitude
Best of luck for your bright future
Thank you
Very Nice Proud of u
Thank you
Really Great
Thank you
Truly inspiring….you can steer yourself any direction you choose.